चॅम्पियन्स ट्रॉफी… अवाॅर्ड समारंभात पाकिस्तानी प्रतिनिधी नसल्याने वाद:29 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन केले होते पाकिस्तानने

रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून जेतेपद पटकावले. तथापि, या समारोप समारंभात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (पीसीबी) कोणताही प्रतिनिधी व्यासपीठावर नव्हता. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान २९ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले की, ‘भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, पण अंतिम सामन्यानंतर पीसीबीचा कोणताही प्रतिनिधी नव्हता. पाकिस्तान यजमान होता. मला समजत नाहीये की पीसीबीचा कोणीही तेथे का नव्हता?’ बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी भारतीय खेळाडूंना पांढरे जॅकेट आणि सामना अधिकाऱ्यांना पदके दिली. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी कर्णधार रोहित शर्माला ट्रॉफी आणि विजेत्यांना पदके दिली. यावेळी न्यूझीलंडचे प्रतिनिधीही उपस्थित होते. सूत्रांच्या मते – पीसीबीचे सीईओ दुबईतच होते पीटीआयच्या वृत्तानुसार, पीसीबीचे सीईओ समीर अहमद समारोप समारंभासाठी दुबईमध्ये उपस्थित होते. परंतु त्यांना स्टेजवर बोलावले नाही. वृत्तांनुसार, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांना ट्राॅफी वितरण साेहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले नाही. न आल्याने योजना बदलली आयसीसी स्पष्टीकरणात म्हटले, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी उपलब्ध नव्हते. सूत्रांच्या मते त्यांनी आयसीसीला सांगितले होते की अध्यक्ष आसिफ झरदारी संसदेत राष्ट्राला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते येऊ शकणार नाहीत. नक्वी हे गृहमंत्रीही आहेत. आम्ही निषेध नोंदवू पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, बोर्ड आयसीसीच्या स्पष्टीकरणावर समाधानी नाही. आयसीसीकडे निषेध नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Share

-