अर्थसंकल्प 2025:लाडकी बहीणसाठी 36 हजार कोटींची तरतूद, शेतकरी कर्जमुक्तीवर मात्र अजित पवारांनी बोलणे टाळले

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 24 लाख महिलांना लखपती दीदी करणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. मात्र, शेतकरी कर्जमुक्ती वर मात्र अजित पवारांनी बोलणे टाळले आहे.