रुग्णवाहिका घोटाळा प्रकरणी तानाजी सावंतांना तुरुंगात टाका:शिंदेंच्या कुंटुबियांचा संबंध तपासा, न्यायालयीन चौकशी करा- आदित्य ठाकरे

एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये रुग्णवाहिका खरेदी घोटाळा झाला. यामध्ये जवळपास 10 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. या प्रकरणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्याचीही घोटाळ्यात भूमिका होती का, याचाही तपास करा. गरज असेल तर तानाजी सावंत यांना तुरुंगात टाका असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. लाडक्या कंत्राटदार, बिल्डरांसाठी जंगल तोड आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवृत्त न्यायाधीशांमार्फत या रुग्णवाहिका घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी. शिवाय 108 नंबर डायल करून दहा मिनिटांत रुग्णवाहिका येते का हे पाहणं गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर मी पर्यावरणमंत्री होतो. केवळ पीओपीमुळेच मुंबईत प्रदूषण होते असे नाही. मुंबईत थर्मल प्लॅण्ट आहेत, आरेतील जंगलात झाडे कापली जात आहेत, लाडक्या कंत्राटदारांसाठी बिल्डरांसाठी जंगल तोडले जात आहे. त्यामुळेही प्रदूषण होत आहे. महायुतीला कसली भीती आदित्य ठाकरे म्हणाले की, महायुती सरकारला एवढे बहुमत मिळाले असताना विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी का घाबरत आहेत. विरोधी पक्षनेतेपद हे लोकशाहीत महत्त्वाचे पद आहे, पारदर्शकता कायम ठेवायची असेल तर ते द्यायला हवे. दर्जा कॅबिनेटचा असतो तो वेगळा, पण लोकांच्या हिताचे प्रश्न सभागृहात अधिक प्रभावीपणे मांडता येतात. दिल्ली अन् महाराष्ट्रातील बहिणींमध्ये फरक काय? आदित्य ठाकरे म्हणाले की, महायुती सरकारची कातडी इतकी जाड आहे की, त्यांनी निवडणुकीपूर्वी वचननाम्यात दिलेल्या दहापैकी एकाही वचनाची पूर्तता केलेली नाही. लाडक्या बहिणींचा आकडा कमी होतोय. दिल्लीच्या बहिणी आणि महाराष्ट्रातील बहिणींमध्ये फरक काय? एकीकडे 2500 आणि दुसरीकडे 2100, तेसुद्धा नाहीत फक्त दीड हजार रुपये दिले जात आहेत, असे ते म्हणाले. सब का मालिक अदानी आदित्य ठाकरे म्हणाले की, साईबाबा म्हणायचे सब का मालिक एक है, पण भाजप म्हणते सब का मालिक अदानी है. कुणी टेंडर पारदर्शकपणे मिळवत असेल तर शिवसेनेचा आक्षेप नाही, पण धारावीसारखा या टेंडरचाही आम्ही अभ्यास करू आणि काही चुकीचे झाले असेल तर लोकांच्या समोर आणू.

Share

-