आखाडा बाळापूर दगडफेक प्रकरण:परस्पर तक्रारीवरून 196 जणांवर गुन्हे दाखल, आरोपींची शोध मोहीम सुरू, पोलिस बंदोबस्त कायम

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे झालेल्या दगडफेक प्रकरणात परस्पर तक्रारीवरून तब्बल 196 जणांवर गुरुवारी ता. 13 आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींची शोध मोहिम हाती घेतली आहे. तर शहरात पोलिस बंदोबस्त कायम आहे. आखाडा बाळापूर येथे कुपटी (ता. कळमनुरी) येथे झालेल्या भांडणाच्या कारणावरून बुधवारी ता. 12 रात्री वाद उफाळून आला. यामध्ये दोन्ही गटाकडील जमाव एकत्र आल्याने परिस्थिती चिघळली अन जमावाने एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरवात केली. या दगडफेकीत चार वाहनांचे नुकसान झाले असून तीघे जण किरकोळ जखमी झाले आहे. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जमावाला नियंत्रीत केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणात रोहित पडघने यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये कुपटी येथे झालेल्या भांडणाच्या कारणावरून जमावाने दगडफेक करून लोखंडी, रॉड व काठी्यांनी मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसांनी शेख आझरू, सय्यद मतीन, मोहसीन कादरी, असलम शेख, सोनु शेख, सद्दाम शेख, अनिस सौदागर, असलम वेल्डींगवाला, मुज्जू शेख, शोएब शेख, खालेद पटेल, जहीर फिल्टर, आमीन कादरी, तोहसीफ शेख, इंजिनीयर कादरी, हँन्टर व इर 150 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणात शेख गुलाम मुस्तफा यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहूल पातोडे, जोतीपाल पंडीत, धारबा पंडीत, विकास पंडीत, अभिजीत नरवाडे, कपील पंडीत गोलू पाईकराव, विजय सुर्यवंशी, संतोष सुर्यवंशी, अनिल काशीदे, धारुकुमार काशीदे, राजकुमार सुर्यवंशी, आशिष पडघणे, संतोष जमदाडे, सुशांत पाईकराव, ओमकार भोकरे व अन्य 25 अशा 40 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपींची शोध मोहिम हाती घेतली असून त्यासाठी पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बसवंते, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, जमादार शिवाजी पवार, राजेश जाधव, राजेश घोंगडे, रामदास ग्यादलवाड यांचे पथक स्थापन केले आहे. दरम्यान, शहरात पोलिस बंदोबस्त कायम असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरीकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस विभागाने दिला आहे.

Share

-