नीतेश राणेंना कोणाच्या धर्माबाबत बोलण्याचा अधिकार नाही:विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका, म्हणाले – त्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

नीतेश राणेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. नीतेश राणेंना कोणत्या धर्माच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही. राणेंना मंत्रिमंडळात ठेवणार का? याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांना विचारणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. भाजपचे आमदार आणि मंत्री नीतेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लीम नव्हते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मटणाच्या दुकानांबाबत हिंदु खाटीकांसाठी त्यांनी मल्हार सर्टिफिकेट हे नवे धोरण आणले. यावरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही नीतेश राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधत घणाघाती टीका केली.
नेमके काय म्हणाले विजय वडेट्टीवार? नीतेश राणेंना हलाल हवे की नाही यासाठी मंत्रिपदाची शपथ दिली नाही. कोणत्या धर्माविरोधात बोलण्याचा त्यांना काय अधिकार आहे. नीतेश राणे यांना कोणत्या धर्माबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाहीये. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. अशा मंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळात ठेवणार का? त्यांच्या विधानाला तुमचे समर्थन आहे का? याबाबत त्यांना महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे लागणार आहे. राम भरोसे हिंदू हॉटेल जोरदार चालवावे हा उद्देश होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. होळीच्या शुभेच्छा देत असताना ही होळी विविध रंगाची आणि विविध ढंगाची असते. ही होळी एकमेकांना आनंद देऊन जाते. रंग एकच धरू नका, त्याला मजा येणार नाही. अनेक रंग लावा, त्या रंगात रंगून जा. तुम्ही एक रंग लावाल तर तुमच्याकडे एकच रंग राहील, मात्र, त्या रंगातून आनंद मिळणार नाही, अशा शब्दांत विजय वडेट्टीवर यांनी नीतेश राणेंवर टीका केली. आजकाल नीतेश राणेंच्या बोलण्यातून राम भरोसे हिंदू हॉटेल जोरदार चालवावे, हा एकच उद्देश दिसत आहे. दुसरे काही केले नाही, तरी हिंदू हॉटेल मात्र नीतेश राणेंच्या वागण्यातून, बोलण्यातून, वक्तव्यातून जोरात चाललंय. काम करा, नका करू, विकास करा, नका करू, काही देणे घेणे नाही. मशीद-मंदिर, मुसलमानों को तोड देंगे, हलाल बंद कर देंगे एवढेच चालू आहे. कोणी काय खावे, याचा त्यांच्याशी काय संबंध? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. आपला देश हा संविधानावर चालतो की, मनुस्मृतीवर चालतो? नीतेश राणेंना संविधानावर विश्वास आहे की नाही? हे त्यांनी स्पष्ट करावे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. मल्हार सर्टिफिकेट काय?
मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकाने उपलब्ध होतील व 100 टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेले आढळणार नाही. मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये असा आवाहन यानिमित्ताने मी करतो. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे निश्चित, असे नीतेश राणे म्हणाले होते.