गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचले:’टोल टोल टन टना टन’ म्हणत टीका; भाषेच्या मुद्यावर राजकीय पोळी न शेकण्याचा सल्ला

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शुक्रवारी धुलिवंदनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे. यावेळी त्यांनी राज यांची टोल टोल टन टना टन म्हणत खिल्ली उडवली. तसेच त्यांना मराठीच्या मुद्यावरून स्वतःची राजकीय पोळी न भाजण्याचा सल्लाही दिला. राज्यात आज सर्वत्र धुळवड साजरी केली जात आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत धुळवड साजरी करताना पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उपरोधिक टीका केली. ते हिंदीत बोलताना म्हणाले, राज ठाकरे यांच्यावर काय बोलायचे? मी तर म्हणेल राज ठाकरे तुम्ही एक करा, टोल टोल टन टना टन, अरे टोल के उपर गिनो भाई, अरे टोल के उपर गिनो. राज समज लेना तुम भाषा के उपर अपनी राजनिती की रोटी न शेकना. मनसेच्या अमेय खोपकरांचे प्रत्युत्तर गुणरत्न सदावर्ते यांच्या या टीकेनंतर मनसे नेते अमेय खोपकर यांनी त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, कोण गुणरत्न सदावर्ते? ते कर्जतवरून बोलत आहेत की कसाऱ्यातून? त्यांच्या मागे बुजगावने उबे असते. बुगुबुगु करत एक प्राणी उभा असतो. ही यांची पात्रता आणि हे आमच्यावर टीका करणार. आमच्या कुटुंबावर टीका करणाऱ्या या लोकांची लायकी काय? त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले? मुळात आज होळीचा सण आहे. मजा करा. घाणेरडे राजकारण करू नका. महाकुंभ व गंगाजलावरूनही केली होती टीका उल्लेखनीय बाब म्हणजे राज ठाकरे यांनी महाकुंभ व गंगाजलाविषयी विधान केले होते. ते म्हणाले होते, बाळा नांदगावकर माझ्यासाठी गंगेचे पाणी घेऊन आले होते. पण, मी म्हणालो हड, मी नाही पिणार. पूर्वीच्या काळी ठीक होते. आता सोशल मीडियावर बघितले. लोक त्यात अंग घासून अंघोळ करत आहेत. कोण पिणार ते पाणी? डोकी हलवा, जरा अंधश्रद्धेतून बाहेर या, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरूनही गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, राज ठाकरे यांचा पक्ष हिंदुत्ववादी आहे की नाही हे त्यांना जाहीर करावे लागेल. त्यांच्या कार्यकर्त्यांनी याविषयी त्यांना जाब विचारला पाहिजे. बाळा नांदगावकर यांच्यासारख्या व्यक्तीने अत्यंत श्रद्धेने जर गंगा मातेचे तीर्थ आणले. पण राज ठाकरे यांनी त्या तीर्थाची अवहेलना व हेटाळणी केली. राज ठाकरे यांना ते पाणी पिण्याची सक्ती नाही. परंतु सार्वजनिक जीवनात कसे वागावे, कसे वर्तन करावे, इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, हे त्यांनी बघायला हवे. हे ही वाचा… ‘माझं काही खरं नाही’ म्हणणारे जयंत पाटील बारामतीत:शरद पवारांची घेतली भेट; म्हणाले – मी नाराज नाही, पण बाहेर बोलायची चोरी झाली पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गत काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. विशेषतः त्यांनी दोन दिवसांपूर्वीच माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका असे विधान केल्यामुळे या चर्चेने चांगलाच जोर धरला होता. त्यानंतर आज सकाळीच त्यांनी बारामतीत येऊन शरद पवारांची भेट घेत या चर्चेला पूर्णविराम दिला. यावेळी बोलताना त्यांनी मी नाराज नाही, पण बाहेर बोलण्याची चोरी झाल्याचे सूचक विधान केले. वाचा सविस्तर