बहुमत जनतेने दिलेले की, ईव्हीएमचे?:मारकडवाडी मध्ये जनतेला मॉकपोल का दिला नाही? अधिवेशनात पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे आक्रमक

महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी आजच्या दिवशी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज आमदारकीची शपथ घेतली नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत एवढा मोठ्या प्रमाणात विजय झाल्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी उत्साह असतो, जल्लोष असतो. मात्र तसे वातावरण राज्यात दिसत नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. महायुतीला मिळालेले बहुमत हे जनतेने दिलेले बहुमत आहे की, ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाने दिलेले बहुमत आहे? असा प्रश्न देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मध्यंतरीच्या काळात काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न निवडणूक आयोगाकडे उपस्थित केले होते. राजकीय पक्ष म्हणून आम्ही जसे प्रश्न उपस्थित करतो, तसेच मारकडवाडी येथील गावकऱ्यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले होते. हे सर्व निवडणुकीच्या निकालानंतर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. विजयी झालेल्या आमदारांनी देखील हे प्रश्न उपस्थित केले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मरकडवाडी मध्ये जनतेने मॉकपोल मागितला होता. मात्र तो मॉकपोल घेऊ दिला नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. केवळ संचारबंदीच नाही तर तेथील काही जणांना अटक देखील करण्यात आली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आज या सर्वांचा जे निषेध करत आहेत ते विजयी झालेले आमदार आहेत. आमच्या मनात ईव्हीएम बद्दल आणि निवडणूक आयोगाबद्दल शंका आहे? तीच आम्ही व्यक्त करत असल्याचा आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. जनतेचा मान राखून जनतेच्या मनातील शंकेचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नसल्याचा आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. लाँग मार्च काढणार लोकशाहीचे दडपवण्याचे काम या आधी देखील झाले होते आणि आता देखील होत आहे. 2014 पासून हे सर्व सुरू असल्याचा आरोप आणि ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळेच मारकडवाडी येथून लाँग मार्च काढण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. हा जनतेचा, बहुमताचा कौल नसल्याचा देखील दावा त्यांनी केला. त्यामुळे या विरोधात आवाज उठवत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मतदानातील 13 टक्के आकडेवारी कशी वाढली? – आव्हाड विधानसभेचा निकाल आल्यानंतर या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा बसेल? असा प्रश्न सर्व सामान्यांच्या मनात निर्माण झाला होता. त्यानंतर मारकडवाडी या गावाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे ठरवले होते. मात्र, असे होत असतानाच निवडणूक आयोग मध्ये आला असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. मला माझ्या गावांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्यात पोलिसांचा काय संबंध? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्हाला महाराष्ट्राला काय खरे आणि काय खोटे दाखवून द्यायचे आहे. गावातील लोकांनी घेतलेल्या निर्णयांवर वरवंटा फिरवण्याचे काम जर लोकशाहीत निवडून आलेले सरकार करत असेल, तर हे निवडून आलेले सरकारच नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. मतदानातील 13 टक्के आकडेवारी कशी वाढली? असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

Share

-