आरोपी दत्तात्रय गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर:सुनावणी सुरू, सहमतीने शारीरिक संबंध असल्याचा आरोपीच्या वकिलाचा दावा

पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली असून त्याला पुणे कोर्टात हजर करण्यात आले. दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध असल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे. कोणताही प्रतिकार केला नाही, तरुणी स्वत:हुन बसमध्ये चढली, असाही दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे. तर सरकारी वकिलांनी आरोपीवरील गुन्ह्यांची माहिती कोर्टात दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांचा जमाव पाहायला मिळाला. मात्र, पोलिसांनी या महिलांना आरोपीच्या सुरक्षेसाठी ताब्यात घेतले. यावरून पुन्हा महिला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आरोपीची सुरक्षा महत्त्वाची आणि आमच्या सुरक्षेचे काय? असा सवाल देखील यावेळी महिलांनी उपस्थित केला. आरोपी दत्तात्रय गाडेला सध्या शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यासाठी नेण्यात येत आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आरोपीला ज्या वाहनातून घेऊन जाणार आहे, त्या वाहनाच्या मागेपुढे पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्या असणार आहे. आरोपीला कोर्टात घेऊन जाण्यापूर्वी वरिष्ठ अधिकारी लष्कर पोलीस ठाण्यात आले आहेत. काही वेळात आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यातून शिवाजीनगर कोर्टात घेऊन जाण्यात येणार आहे. यावेळी पिंजरा वाहनासह आरोपीला ज्या वाहनातून घेऊन जाणार आहेत त्या वाहनाच्या पुढे मागे पोलिसांच्या गाड्या असणार आहेत. ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत