आधी पक्षांतर्गत नेत्याची निवड नंतर मुख्यमत्र्यांची:देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पुढीची प्रक्रिया; शिंदेंचा ठाकरेंना तर अजित पवारांचा शरद पवारांना टोला

विधानसभेत महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. आतापर्यंतच्या अनेक वर्षांचा निवडणुका आपण पाहिल्या मात्र अशा पद्धतीने लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आपण पाहिली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. लाडक्या बहिणी असेल, लाडके भाऊ असतील किंवा लाडके शेतकरी असतील या सर्वांनी महायुतीवर मनापासून प्रेम दाखवले आहे. त्या सर्वांचे आभार देखील शिंदे यांनी मानले आहे. या ऐतिहासिक विषयासाठी सर्वांना दंडवत घातला पाहिजे, अशा शब्दात मतदारांचे आभार देखील शिंदे यांनी मानले. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे अभार मानले. मागील दोन ते सव्वा दोन वर्षात या राज्यांमध्ये जे काम केले, त्या सर्व कामाची ही पोचपावती असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आम्ही जे ऐतिहासिक निर्णय घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती असे निर्णय होते. आम्ही एकीकडे विकास केला. यात महाविकास आघाडीने जी सर्व कामे थांबवली होती ती सर्व कामे सुरू केली असल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला आहे. घरी बसून सरकार चालत नाही – मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी कोणाची याचा निर्णय जनतेने दिला असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारा असलेली शिवसेना कोणाची, याचही निर्णय जनतेने दिला असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. घरी बसून सरकार चालत नसते, हे जनतेने दाखवून दिले. असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेसमोर महायुती नतमस्तक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महायुतीवर महाराष्ट्राने दाखवलेला हा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात काम करावे लागणार असल्याची जाणीव होत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व मतदारांच्या चरणी आम्ही नतमस्तक होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांना मतदारांना आश्वस्त करतो की, जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला आम्ही तडा जाऊ देणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आमची जबाबदारी वाढवणारा हा विजय असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Share

-