आघाडीचे सरकार आल्यास संघावर बंदी घाला:उलेमा बोर्डाच्या मागणीला काँग्रेसकडून संमती, आघाडीचे सरकार येण्यासाठी उलेमा बाेर्ड करणार प्रचार

ऑल इंडिया उलेमा बोर्डाने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच १७ मागण्यांचे एक निवेदनही दिले आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासनही दिले आहे. या मागण्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीची प्रमुख मागणी आहे, ती मान्य करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सुप्रीम बाॅडी चेअरमन असलेले नायाब अन्सारी, महाराष्ट्र प्रदेेश अध्यक्ष मौलवी अस्मान शेख व महासचिव माे. शहाबुद्दिन सौदागर यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या निवेदनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये २०१२ पासून झालेल्या दंगलीमध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांवर गुन्हे दाखल केले. महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर २०१२ ते २०२४ पर्यंत मुस्लिम समाजाच्या लोकांवर दाखल केलेले गुन्हा परत घ्यावे, जेलमध्ये असलेल्या मौलाना सलमान अजहरी यांना सोडण्याची शिफारश आघाडीच्या ३१ खासदारांनी आपापल्या लेटरपँडवर मोदी सरकारला पत्र द्यावे, महाराष्ट्रामध्ये मस्जिदचे इमाम, मोअजनला महाराष्ट्र सरकारतर्फे दर महिन्याला १५ हजार रूपये देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. रामगिरी महाराज, नितेश राणे यांना जेलमध्ये टाकण्यासाठी इंडिया आघाडीने आंदोलन करावे, ऑल इंडिया उलेमा बोर्डचे मुफ्ती मौलाना, आलीम हाफिज मस्जिदचे इमाम यांना इंडिया आघाडी महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यावर शासकीय समितीवर घेण्यात यावे, महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणूकमध्ये मुस्लिम समाजाच्या ५० उमेदवारांना तिकीट देण्यात यावे, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मालमत्तेवर झालेल्या अतिक्रमणाला हटवण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेमध्ये ठराव घेऊन कायदा करण्यात यावा, आरएसएस संघटनेवर बंदी घालावी, आदी मागण्या केल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये आघाडीचे सरकार येण्यासाठी उलेमा बोर्ड ताकदीने मोठ्या स्तरावर काम करणार आहे. आघाडीचा प्रचार करण्यासाठी ऑल इंडिया उलेमा बोर्डला ४८ जिल्ह्यामध्ये लागणारी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी, ही मागणीही करण्यात आली. देवीची ओढणी, बजरंगबलीचा रंगही लाल, मग फडणवीसांना त्रास का ? दुर्गादेवीची ओढणी लाल रंगाची आहे. बजरंगबलीचा रंग लाल आहे. सूर्याच्या उगवतीचा आणि मावळतीचा रंगही लालच आहे. लाल हा ऊर्जेचा रंग आहे. तरीही देवेंद्र फडणवीसांना लाल रंगाचा एवढा त्रास का होत आहे, असा सवाल छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि विदर्भाचे प्रभारी भूपेश बघेल यांनी शुक्रवारी नागपुरात केला. नागपुरातील संविधान संमेलनात उपस्थितांना मुद्दे लिहून घेण्यासाठी लाल रंगाचे नोटपॅड देण्यात आले होते. त्यात रंगावर जाण्याचे कारण नव्हते. भाजपला आधी हिरव्या रंगाचा त्रास होता. आता लाल रंगाचा त्रास आहे. देवेंद्र फडणवीस नैराश्यात असल्याने ते अशी वक्तव्ये करीत आहेत, असे बघेल यांनी सांगितले. संविधान सन्मान कार्यक्रमात राहुल गांधी नेहमी लाल रंगाचे मुखपृष्ठ असलेली संविधानाची प्रत दाखवतात. त्यावरून फडणवीसांनी खरपूस टीका केली होती. नागपुरात एकूणच भारताच्या संविधानाबद्दल राहुल गांधींची अनास्था पाहायला मिळाली. लाल पुस्तक घेऊन त्यांना संविधानाचा गौरव करायचा नाही, तर त्यांच्यासोबत असलेले शहरी नक्षलवादी आणि अराजकतावादी यांना एक प्रकारे इशारा देण्यासाठी तसेच त्यांची मदत घेण्यासाठी हे नाटक केले आहे, अशी टीका फडणवीसांनी केली होती. त्यावर बघेल यांनी फडणवीसांना लाल रंगाची अॅलर्जी का आहे, असा सवाल केला. गडकरींचा भाजपकडून अपमान आज देशात आणीबाणीपेक्षा वाईट अवस्था आहे. सरकारविरोधात लिहिणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातात. नितीन गडकरी यांनी काँग्रेसबद्दल चिंता करण्यापेक्षा स्वत:कडे पाहावे. त्यांचा जेवढा अपमान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केला, तेवढा यापूर्वी कधीही कुठल्याच पार्टीने केला नाही, असा टोला बघेल यांनी लगावला.

Share