अजित पवारांच्या घरी येणार सूनबाई:धाकटे चिरंजीव जय पवार यांचे ठरले लग्न, शरद पवारांचा जोडीने घेतला आशीर्वाद; वाचा कोण आहे सून?

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पावर यांचे लग्न ठरले आहे. त्यांचा साखरपुडा येत्या 10 एप्रिल रोजी होणार आहे. जय पवार व त्यांच्या होणाऱ्या भावी पत्नीने स्वतः जोडीने जाऊन या कार्यक्रमाचे निमंत्रण शरद पवारांना दिले. या लग्नाच्या निमित्ताने पवार कुटुंबीयांत आलेला राजकीय दुरावा दूर होण्याची शक्यता आहे. जय पवार यांचे ऋतुजा पाटील हिच्याशी लग्न ठरले आहे. येत्या 10 एप्रिल रोजी त्यांचा साखरपुडा होणार आहे. तत्पूर्वी, या दोघांनीही काल आपले आजोबा शरद पवारांच्या मोदीबागेतील घरी जाऊन त्यांना या साखरपुड्याचे निमंत्रण दिले. यावेळी पवारांसह त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याशी आपुलकीने स्वागत केला. यावेळी दाम्पत्या जीवनात प्रवेश करणाऱ्या या जोडीचे औक्षणही करण्यात आले. सुप्रिया सुळे यांनी एका पोस्टद्वारे पवार कुटुंबीयांच्या या भेटीचे फोटो सार्वजनिक केले. कोण आहेत पवारांची होणारी सून? उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांना पार्थ व जय ही दोन मुले आहेत. जय पवार हे त्यांचे धाकटे चिरंजीव आहेत. त्यांचे ऋतुजा पाटील हिच्याशी लग्न ठरले आहे. ऋतुजा या साताऱ्याच्या फलटनच्या आहेत. प्रवीण पाटील असे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. ते सोशल मीडिया कंपनी सांभाळतात. ऋतुजा उच्चशिक्षित असून, त्यांची व जय पवार यांची गत अनेक वर्षांपासून मैत्री असल्याची माहिती आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण या केसरी ट्रॅव्हल्सचे केसरी पाटील यांच्या घरच्या सूनबाई आहेत. जय पवारांचा उद्योग व्यवसायाकडे कल जय पवार यांचा राजकारणापेक्षा उद्योग व्यवसायाकडे जास्त कल आहे. त्यांनी दुबईत काही वर्षे व्यवसाय केला. सध्या ते मुंबई व बारामती येथील आपला व्यवसाय पाहत आहेत. परंतु घरातच राजकारण असल्याने तसेच आई-वडील दोघेही लोकप्रतिनिधी असल्याने सामान्यांच्या प्रश्नांची -सोडवणूक करण्याकरिता ते ही राजकारणातही सध्या सक्रिय होत असल्याचे दिसते. जय यांचे मोठे बंधू पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आहे. आत जय पवारही गत काही महिन्यांपासून बारामतीत तळ ठोकून आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या मातोश्री सुनेत्रा पवार व त्यानंतर विधानसभा निवडणुकीत वडील अजित पवार यांचा प्रचार केला. त्यांच्या लग्नामुळे आता राजकीय वितुष्ट आलेले पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे आहेत. हे ही वाचा… काँग्रेसची एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर:अजित पवारांनाही चुचकारले; नाना पटोले यांच्या प्रस्तावाने राज्यात राजकीय धुळवड मुंबई – काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वाचा सविस्तर

Share

-