अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील:जय पवार यांचा दावा; तेच किंगमेकर राहणार असल्याचा व्यक्त केला विश्वास

अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी केला आहे. आगामी निकालानंतर अजित पवार हे राज्यात किंग मेकर असतील. तसेच तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, असे जय पवार यांनी म्हटले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. राज्यातील सर्वात हॉट सीट म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत या मतदारसंघांमध्ये होत आहे. या मतदारसंघात अजित पवार यांनी विजयाचा दावा केला असला तरी देखील दुसरीकडे शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील जनता कोणाच्या बाजूने मतदान करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या संदर्भात जय पवार यांना विचारले असता त्यांनी अजित पवार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. इतकेच नाही तर या निवडणुकीनंतर अजित पवार हे किंग मेकरच्या भूमिकेत असतील. तसेच तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा देखील जय पवार यांनी केला आहे. याआधी देखील छगन भुजबळ यांनी तसेच नवाब मलिक यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असा दावा केला होता. त्यामुळे आता राज्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून येतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अजित पवारांकडूनही बहुमताचा दावा मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना बहुमताचा मुद्दा उपस्थित केला. निवडणूक झाल्यानंतर सर्व आमदार एकत्र बसून मुख्यमंत्री कोण? या बाबत निर्णय घेणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. आम्ही महायुतीचे सर्व निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेऊ आणि त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवू, असे पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील अजित पवार यांनी सर्व अडचणी सोडवण्याचा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. शेतकऱ्यांना एमएसपी वाढवून देण्याबाबत आम्ही सकारात्मक निर्णय घेण्याचा आग्रह त्यांना करणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. राज-शर्मिला ठाकरेंचे मतदान:’अमित’च्या रुपाने चांगला उमेदवार मिळाल्याचा आनंद; तर तावडेंच्या प्रकारावर राज यांचे मौन आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस असल्याचे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे. अमित ठाकरे यांच्या रुपाने मतदारसंघाला एक चांगला उमेदवार लोकांना मिळाला, याचा आनंद त्यांना वाटत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यामुळेच येथील मतदार हे आमच्यासाठी संवाद साधत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पूर्ण बातमी वाचा… अजित पवार यांचे मोठे वक्तव्य:’त्या’ ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे – नाना पटोलेंचा; म्हणाले, एक बहीण तर दुसऱ्यांसोबत मी काम केले सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा या दोघांचाच आवाज असण्याची शक्यता वर्तवली आहे. या संदर्भात अजित पवार म्हणाले की, “जे काही ऑडिओ क्लिप दाखवले जात आहे, मला एवढेच माहित आहे की, मी या दोघांसोबत काम केले आहे. त्यापैकी एक माझी बहीण आहे. दुसरे असे आहेत ज्यांच्यासोबत मी काम केले आहे. त्यांचा आवाज मला ओळखता येतो. मात्र, या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर सर्व ‘राज’ म्हणजेच सर्व सत्य स्पष्ट होईल.’ पूर्ण बातमी वाचा…. ‘जो जीता वही सिकंदर’:काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार; भाजपकडून साम-दाम-दंड-भेदाचा वापर होत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष हा साम-दाम-दंड-भेद आणि ईडी – सीबीआयच्या माध्यमातून दहशत निर्माण करून निवडणुकीला सामोरे जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. इतकेच नाही तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी या मतदारसंघातील जनतेला केले आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या आहेत. तशी ही लढत देखील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, काडादी यांना काँग्रेसचा एबी फॉर्म न देऊन आपण महाआघाडीचा धर्म पाळला असल्याचा दावा देखील प्रणिती शिंदे यांनी केला आहे. इतकेच नाही तर ‘जो जीता वही सिकंदर’ असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. पूर्ण बातमी वाचा….

Share

-