अमरावती विद्यापीठात महिला सक्षमीकरण कार्यशाळा:स्त्रियांना कायद्याचे ज्ञान आवश्यक, पोलिस निरीक्षक दिप्ती ब्राम्हणे यांचे मत

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात एका महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. भरोसा महिला सेलच्या पोलीस निरीक्षक दिप्ती ब्राम्हणे यांनी महिला सक्षमीकरणासाठी कायद्याच्या ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. विद्या परिषद सदस्य डॉ. जयश्री धोटे आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मालोकार यांची विशेष उपस्थिती होती. दिप्ती ब्राम्हणे यांनी सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील महिलांच्या आव्हानांवर प्रकाश टाकला. त्यांनी पोस्को कायदा, पॉश कायदा आणि विशाखा समितीबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. डॉ. जयश्री धोटे यांनी महिलांना स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. डॉ. श्रीकांत पाटील यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील लिंगभेदावर चर्चा केली. कार्यक्रमात डॉ. मालोकार यांच्या ‘प्रसुतीचा प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षा डॉ. वैशाली गुडधे यांनी स्त्रियांमधील नैसर्गिक नेतृत्वगुणांचा उल्लेख केला. त्यांनी जिजाबाई आणि मुक्ताबाई यांच्या उदाहरणांद्वारे महिला सक्षमीकरणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यशाळेला विद्यापीठातील संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

Share

-