अरब देशांत भारतमार्गे ड्रग्ज पुरवठा:तब्बल 2 लाख कोटींचा व्यवसाय, आता अरब-आफ्रिका ड्रग्जचे इमर्जिंग मार्केट
भारतात ड्रग्ज तस्करीचा गोरखधंदा वेगाने वाढत आहे. भारतात येणाऱ्या ड्रग्जपैकी जवळपास ४०% हिश्श्याची स्थानिक बाजारात विक्री होते. मात्र उरलेले ६०% ड्रग्ज भारतातून अरब आणि अाफ्रिकेत जात आहे. आयएनसीबीनुसार (इंटरनॅशनल नार्कोटिक कंट्राेल ब्यूरो) भारत ड्रग्ज पुरवठ्याचा सहजसुलभ मार्ग बनल्याचे स्पष्ट होत आहे. असे असले तरी भारतात एनसीबीपासून इतर केंद्रीय संस्था यावर अंकुश ठेवण्यासाठी सतत कारवाई करत आहेत. आतापर्यंत युरोप-अमेरिकेला विक्रीचे सर्वात मोठे मार्केट मानले जात असे. मात्र आता अरब देश इमर्जिंग मार्केटच्या रुपाने पुढे येत आहेत. येथे जवळपास २ लाख कोटी रुपयांचा ड्रग्ज पुरवठा होतो. अरब देशात सक्रिय भारतीय आणि पाकिस्तानी गुन्हेगारांची टोळी हे ड्रग तिथे विकतात. अाफ्रिकी देशातही विक्री केली जाते. या व्यवसायामुळे आफ्रिकेत नार्को टेररचे जाळे विस्तारत आहे. राजकीयदृष्ट्या अस्थिर अनेक आफ्रिकी देशांत ड्रग्जच्या पैशांतून बंडखोरांचे पेव फुटले आहे. कोणत्या मार्गाचा वापर? रस्ता मार्गाने पुरवठा करण्यात धोका जास्त. समुद्रमार्गे फिश ट्रेलर आणि कार्गो जहाजांचा वापर. भारतात एंट्री पॉइंट गुजरात, महाराष्ट्र आणि केरळ किनारे. पूर्वोत्तर राज्यांतील म्यानमारच्या सीमाभागात ड्रग्ज पुरवठा. मणिपूरमध्ये मोरेह आणि मिझोराममध्ये चंपई हे मोठे केंद्र. येथे स्थानिक विक्रीसह इतर भागातही पुरवठा. म्यानमारचे ६ तस्कर अटकेत
कोस्ट गार्डने (तटरक्षक दल) बंगालच्या खाडीत मोठी कारवाई केली. तब्बल ६ हजार किलो ड्रग मेथमफेटामाइन (मेथ) पकडले आहे. ही या वर्षातील सर्वात मोठी कारवाई. यासह कोस्ट गार्डने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मेथ ड्रग पकडले आहे. कोस्ट गार्डचे पेट्रोल विमान डोनियरला पोर्ट ब्लेअरपासून १५० किमी दूर पूर्वेत स्थित बॅरन बेटावर एक फिश ट्रेलर संशयास्पद अवस्थेत तरंगताना आढळला. कोस्ट गार्डच्या जहाजांनी ट्रेलरला घेरले. या ट्रेलरमधून दोन-दोन किलोची तीन हजार पाकिटे जप्त करण्यात आली. त्यात मेथ आढळले. म्यानमारच्या ६ तस्करांनाही अटक करण्यात आली. वर्षाच्या शेवटीच मोठी धरपकड का?… युरोप आणि अमेरिकेत ख्रिसमस व नववर्षाचा उत्सवी काळ. ड्रग्जची विक्री मोठ्या प्रमाणात होते. अँटी नार्कोटिक्स एजन्सीने फेब्रुवारीत गुजरात किनाऱ्यावर ३३०० किलो ड्रग्ज पकडले होते. अंदमानच्या जप्तीआधीची ही सर्वात मोठी कारवाई. नोव्हेंबरमध्ये एका इराणी जहाजातून ७०० किलो ड्रग्ज पकडण्यात आले.