भंडारा पोलिस अधीक्षक कार्यालयातील DB ऑफिसला आग:कागदपत्रे, कॉम्प्युटर संच जळले; सुदैवाने जीवित हानी नाही

भंडारा पोलिस अधीक्षक ऑफिसच्या मागिल भागात असलेल्या DB ऑफिसला बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने संपुर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. पोलिस अधीक्षक यांच्या चेंबरच्या अगदी लागुन असलेल्या परिसरात DB ऑफिस आहे. सुट्टी झाल्यावर ऑफिसमधील कर्मचारी घरी गेले. रात्री 9:30 च्या सुमारास काही पोलिस कर्मचाऱ्यांना ऑफिस मधून धूर निघत असल्याचे दिसुन आले. जवळ जावून पाहिल्यावर आत मध्ये आग लागली होती. लगेच अग्नी शमन विभागाची गाडी बोलावण्यात आली व आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तो पर्यंत DB ऑफिस मधील कागदपत्रे, कॉम्प्युटर संच जळले होते. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत….