जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र वितरण नसल्याने त्रास:तत्काळ सुरू करण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

प्रतिनिधी | अमरावती शहरातील मनपा तसेच जिल्ह्यातील तहसील कार्यालयात मिळणारे जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र वितरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामूळे प्रहार जनशक्ती पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. गुरुवारी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील मनपा कार्यालय तसेच तहसील कार्यालयात काही दिवसांपासून नवीन जन्म दाखल्यांचे वितरण बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणामुळे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचे आधार कार्ड, राशन कार्ड तसेच जन्म दाखल्यावर अवलंबून असलेले कार्यालयीन कामकाज थांबले आहे. त्यामुळे नागरिकांचे अत्यंत हाल होत आहेत. बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करत दोषींवर कठोर कार्यवाही करावी. तसेच बंद करण्यात आलेले नवीन जन्म दाखल्यांचे वितरण त्वरित सुरू करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदनातून दिला आहे. यावेळी छोटू महाराज वसू, महानगर प्रमुख बंटी रामटेके, प्रदेश प्रवक्ते जितू दुधाने, शेख अकबर, गोलू पाटील , अभिजित देशमुख, श्याम इंगळे, नंदकिशोर कुयटे, अभिजित गोंडाणे, उमेश मेश्राम, मो जावेद, इमरान शाह, विक्रम जाधव, अजय तायडे, कुणाल खंडारे राहुल खोब्रागडे आदी उपस्थित होते.

Share

-