राज्यात व्होट जिहादसाठी 125 कोटी रुपये आले:भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप
विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादची चर्चा सुरू असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली. ‘या व्होट जिहादसाठी राज्यात सुमारे १२५ कोटींचा बेनामी हवाला व्यवहार झाला आहे,’ असा आरोप सोमण्यांनी पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले, ‘नोव्हेंबरच्या सुरुवातीला केवळ ४ दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेनामी व्यवहार झाले. या संपूर्ण प्रकरणाची लेखी तक्रार मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) राजीवकुमार यांच्याकडे करून त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. सोमय्या म्हणाले की, याप्रकरणी मालेगावच्या छावणी ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. मालेगाव येथे बोगस, बेनामी खात्यांमध्ये १२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची २५०० हून अधिक क्रेडिट्स प्राप्त झाली. बनावट कागदपत्रांचा वापर करून ऑक्टोबरमध्ये अशी १४ बेनामी खाती उघडण्यात आली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल येथून २०० हून अधिक बैंक शाखांमधून हे १२५ कोटी रुपये प्राप्त झाले, ही रक्कम ४०० हून अधिक्क व्यवहारांद्वारे काढण्यात आली तर १७ खात्यांद्वारे हस्तांतरित करण्यात आली. मुंबई व अहमदाबादमधील दीन खात्यांमध्ये ५० कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. सिराज अहमद व नईम खान गांची नावे समोर आली आहेत.’ मालेगावात अतिशय आक्रमक व्होट जिहाद मालेगावात अतिशय आक्रमक व्होट जिहाद सुरू आहे. लोकसभेत येथे भाजपच्या उमेदवाराला केवळ १०० तर काँग्रेसच्या उमेदवाराला एकूण १ लाख ९४ हजार मते मिळाली होती. मी पोलिस, आयटी, इंडी, सीबीडीटी, सीबीआयसह विविध तपास संस्थांना आक्रमक तपास करण्याची विनंती करतो. हा पैसा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वापरला जाईल अशी भीती वाटते, असे सोमय्या म्हणाले,