भाजपचे महाराष्ट्रात मिशन ‘युवा’:विधानसभेतील यशानंतर तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न; शहा, नड्डांच्या उपस्थितीत शिर्डीत अधिवेशनाचे आयोजन

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता भारतीय जनता पक्षाने पक्ष वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. या संदर्भात जास्तीत जास्त युवकांना पक्षासोबत जोडण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून युवकांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने अधिवेशन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. भाजपच्या वतीने 12 जानेवारी रोजी शिर्डी येथे हे अधिवेशन होणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. या बैठकीला राज्यभरातून 10 हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे यांची पोस्ट देखील पहा….. ‘स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र भाजप एक मोठा उपक्रम हाती घेत आहे. 12 जानेवारी 2025 रोजी शिर्डीत भाजपचे प्रदेश अधिवेशन होणार आहे, या ऐतिहासिक कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा भाई आणि राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे. पी. नड्डा जी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस जी यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर आधारीत या अधिवेशनातून युवकांना प्रेरित करून भाजपकडे आकर्षित करण्यासाठी नव्या अभियानाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रभरातून 10 हजार भाजप पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम भाजपच्या आगामी योजनांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, ज्यामध्ये तरुणाईशी संपर्क वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येईल.’ राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. शरद पवारांचे 5 खासदार फोडले तरच अजित पवारांना केंद्रात मंत्रीपद:संजय राऊत यांचा दावा; मोदी 2029 मध्ये पंतप्रधान असण्यावर प्रश्नचिन्ह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 5 खासदार फोडले तरच केंद्रात मंत्री पद दिले मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना सांगितले आहे. असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या माध्यमातून संजय राऊत यांनी भाजप आणि अजित पवार गटावर निशाणा साधला. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा…. संजय राऊत यांच्या बोलण्यात वैफल्य दिसते:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरुन विजय वडेट्टीवार यांचा निशाणा संजय राऊत यांच्या देहबोलीतून ते वैफल्यग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या बोलण्यातूनही तसे जाणवत आहेत. त्यामुळे त्यांना आलेल्या निराशेतून त्यांनी एकला चलोचा नारा दिला असेल. असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्धव ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावरुन वडेट्टीवार यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा….

Share

-