कार आणि दुचाकीचा भीषण अपघात:पती-पत्नीचा जागीच मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा; 3 जण गंभीर जखमी
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे कार आणि दुचकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नांदगाव ते चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड टोल नका परिसरात झाला आहे. अपघात झाल्यानंतर पोलिस व स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले. या भीषण अपघातात मृत झालेल्या पती-पत्नीचे नाव भाऊसाहेब माळी व लंकाबाई माळी असे आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात फेकल्या गेल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच नांदगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. नांदगाव ते चाळीसगांव या रस्त्यावर पिंपरखेड टोल नका परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच यात तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही वाहने वेगात असल्याने या वाहनांची समोरासमोर जोराची धडक बसली. ही धडक इतकी तीव्र होती की दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात फेकली गेली. यात दुचाकीचा पूर्णतः चेंदामेंदा झाला आहे. नंदगाव परिसरात या आपघातांमुळे शोककळा पसरली आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच मृताच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. नांदगाव ग्रामीण पोलिसांनी देखील घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले तसेच पंचनामा देखील केला आहे.