स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा चोरट्यांनी मोबाइल पळवला:विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या अनोळखी दोन चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आल्याची घटना सदाशिव पेठेत घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत बिरदेव सिद्धप्पा डोणे (वय 26, सध्या रा. नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बिरदेव डोणे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. विश्रामबाग वाड्यासमोर असलेल्या एका इमारतीतील अभ्यासिकेतून तो 10 मार्च रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घरी पायी जात होता. त्यावेळी राधिका भेळ दुकानासमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी डोणे यांच्या हातातील मोबाइल जबरदस्तीने हिसकावून घेतला. डोणे यांनी आरडाओरडा केली असता दुचाकीस्वार चोरटे भरधाव वेगाने दुचाकीवर पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलिसांनी विश्रामबाग वाडा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासत आहे. बेकायदेशिरित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक बेकायदेशिररित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सिंहगडरोड पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि 7.65 ची (42 हजारांचे) काडतुसे जप्त करण्यात आली आहे. सोमनाथ भिमा चांदणे (रा. 21, रा. वडगाव पठार, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वडगाव येथील जाधवनगर मध्ये एक जण कुदळे यांच्या पत्र्याच्या शेडजवळ थांबला असल्याची माहिती सिंहगडरोड पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेण्यात आले असता त्याच्या जवळून एक देशी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतसु जप्त करण्यात आली. त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात आली परंतु त्याच्याकडून तपासात प्रतिसाद मिळत नाही. कोणत्या तरी गुन्हा करण्यासाठी चांदणे तेथे उभा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.