अधिवेशन संपवून अजित पवार मस्साजोगमध्ये दाखल:संतोष देशमुख कुटुंबियांचे केले सांत्वन, दोषींना सोडणार नसल्याची दिली ग्वाही

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेला 13 दिवस उलटून गेले आहेत. संतोष यांच्या तेराव्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मास्टरमाइंडला सोडणार नाही. दोषींना शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मस्साजोगमध्ये दाखल झाले. अधिवेशन संपताच अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. ही घटना फार वेदनादायी, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. संतोष यांच्या हत्येची न्यायालयामार्फत तसेच कुणाचाही दबाव येऊ नये, यासाठी आयजी लेव्हलच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फतही चौकशी करत आहोत, असे अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांना सांगितले. मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी संतोष देशमुख यांचे मारेकरी तसेच या मागचा मास्टरमाइंड कोणीही असला, तरी त्यांना सोडणार नाही. तुम्ही अजिबात घाबरू नका. वेळ पडल्यास तुम्हाला पोलिस बंदोबस्त देऊ, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. शिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला आपण तयार असल्याचे अजित पवार यावेळी म्हणालेत.

बातमी अपडेट करत आहोत….

Share

-