DCM म्हणजे डेडीकेटेड कॉमन मॅन:मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करत एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा शपथविधी झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक असा शपथविधी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने पाहिला आहे. सर्वसामान्य माणसाचे सरकार आणि या राज्याला विकासाकडे घेऊन जाणारे सरकार आणि बाळासाहेबांच्या विचाराचे, सर्व लोकांना सोबत घेऊन जाणारे सरकार आणि सर्वांनी न्याय देणारे हे सरकार आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद देणारे सरकार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे म्हणाले, देशाला वैचारिक दिशा देणारे महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो आणि खऱ्या अर्थाने गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यात आणि देशात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे केंद्र सरकारने देखील राज्याला पाठबळ दिला, भरभरून सहकार्य दिले आणि त्यासाठी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांचे मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे हे आम्ही अभिनंदन करतो व धन्यवाद देतो. नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद करतो. राजभवनमध्ये पत्रकार परिषद घेताना मी म्हणालो अडीच वर्षांपूर्वी माझे नाव त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सुचवले आणि मी त्यांचे नाव यावेळेस सुचवले याचा आनंद मला आहे आणि समाधान आहे. कारण शेवटी एकत्रीत आम्ही काम केले. त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव तो आम्हाला मिळाला आणि त्यामुळे मी त्यांना मनापासून आज शुभेच्छा देतो. एकनाथ शिंदे म्हणाले, आधी आम्ही 40 आमदार होतो आता 57 अधिक 3, 60 झालो. सत्ता हे जनसेवेचे साधन आहे अशा पद्धतीचे काम आम्ही केले कारण मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार, काय मिळाले, पुढे काय मिळाणार ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही काम केले. ही भावना मनात ठेवूनच आम्ही पुढेही काम करत राहू. जनतेचे सरकार जनतेसाठी. मी नेहमी कार्यकर्ता म्हणूनच काम केले आणि यापुढे देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. पदापेक्षा कामाला जास्त महत्व दिले. मी आता डीसीएम आहे डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन.