दीडशे मतदारसंघात जवळपास 20 ते 25 हजार मतदार वाढवले:प्रत्येक बूथ वर शंभर ते दीडशे मत वाढवले, संजय राऊतांचा दावा

मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचा डेटा सादर न केल्याने ही नोटीस देण्यात आली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेवटच्या तासात वाढलेले मतदान हा घोटाळा असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान कसे? निवडणूक आयोग म्हणते हे शक्य आहे, अरे कसे शक्य आहे? 76 लाख? आणि आपण जर मागणी केली साधारण दीडशे मतदारसंघात तर जवळपास 20 ते 25 हजार मतदार वाढवले आहेत. आणि प्रत्येक बूथ वर शंभर ते दीडशे मत वाढवले आहेत. हा जो घोळ आहे त्यातूनच महाराष्ट्रमध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सरकार स्थापन झाले. हे सरळ मार्गाने सरकार आलेले नाही आणि हायकोर्टाने विचारले की हे बरोबर आहे का पण जनता सुद्धा तेच विचारत आहे. हायकोर्टाने विचारलेल्या प्रश्नाच्या मुळापर्यंत गेले तरच या देशातील लोकशाहीला एक भक्कम आधार मिळेल. संजय राऊत म्हणाले, कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालं तर या देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास जो घसरत चाललेला आहे तो पुन्हा एकदा विश्वास बनेल. मरकडवाडी तर देशाच्या नकाशावर गेली. मरकडवाडी माळशिरस मतदारसंघातील उत्तमराव जानकर यांचा मतदारसंघ येथील गाव आहे. या गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे मॉक पोल घेण्याची तयारी दाखवली मराठी पेपर वर आणि अख्या देशांमध्ये त्याची चर्चा झाली युनो मध्ये चर्चा झाली की भारतातल्या लोकशाहीला कसे ग्रहण लागले आहे आणि जे मतदान झाले आहे त्यावर लोकांचा कसा विश्वास नाही यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली. पण निवडणूक आयोगाने मरकडवाडीत 144 कलम लावले कारण ते घाबरले. हीच मग लागण अख्या देशांमध्ये लागेल अशी भीती त्यांना वाटली आणि यांचं बिंग फुटेल हे त्यांना लक्षात आलं, अशी टीका संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर केली आहे. पुढे बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर देखील टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, तो त्यांचा पक्षच नाही. तो अमित शहा यांचा पक्ष आहे. त्यातील 20 ते 25 आमदार तर थेट भाजप पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे मला या दोन्ही गटाचे काही खरे वाटत नाही. अजित पवार गटाचे आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते भाजपमध्ये विलीन होतील. तसेच आनंदराव आडसुळ यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आले तर आनंदच होईल, असे म्हंटले आहे, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, त्यांच्या नावातच आनंद आहे. खरी शिवसेना आमची आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना खरी आहे आणि आमची शिवसेना आमच्या जागेवर आहे. आमची सुद्धा तेव्हा इच्छा होती की पक्ष तुटू नये.

Share

-