बीडमधील 26 पोलिस वाल्मीक कराडच्या मर्जीतले:तृप्ती देसाईंनी जाहीर केली यादी, जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बीड जिल्ह्यातील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक आरोप आणि गौप्यस्फोट झाले. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड असल्याचा आरोप होत आहे. अशातच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीका करण्यास सुरवात केली आहे. तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियावर बीड जिल्ह्यातील 26 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. हे सर्व अधिकार आणि कर्मचारी वाल्मीक कराडचे निकटवर्तीय आणि मर्जीतील असल्याचा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह अन्य आरोपी अटकेत आहेत. वाल्मीक कराड आणि इतरांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र, एक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यातच वाल्मीक कराडचे खंडणीचे रॅकेट आणि त्याच्यावर असलेल्या राजकीय वरदहस्ताच्या चर्चा रंगत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. काय म्हणाल्या तृप्ती देसाई?
कराडचे जाळे हे बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. वाल्मिक कराडचे निकटवर्तीय, मर्जीतील पोलिस अधिकारी मोठ्या प्रमाणावर असून देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पारदर्शीपणे करावा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. तृप्ती देसाई यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाची यादी जाहीर केली असून या पोलिसांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी देखील त्यांनी केली. …तरच बीड जिल्ह्यातील गुंडाराज रोखता येईल
वाल्मीक कराडच्या निकटवर्तीय/ मर्जीतील बीड येथील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मी येथे शेअर करीत आहे. गृहमंत्र्यांनी आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सर्व खात्रीलायक चौकशी करून त्यांची बदली बीड जिल्ह्याच्या बाहेर करणे गरजेचे आहे, तरच आपण बीड जिल्ह्यातील गुंडाराज रोखू शकतो, असेही तृप्ती देसाई म्हणाल्या. कोण-कोणते पोलिस अधिकारी/कर्मचारी कराडच्या मर्जीतले?

Share

-