धनंजय मुंडे, बालाजी तांदळेसह 10 जणांना सहआरोपी करा:अंजली दमानिया यांची मागणी; लालसिंग राजपुरोहितवरही गंभीर आरोप

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे, बालाजी तांदळे यांच्या सह इतर 10 जणांना देखील सहआरोपी करण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांवर मुंडे यांचा दबाव होता. याचे अनेक पुरावे आता समोर आले आहेत. तसेच आरोप पत्रामध्ये कोणत्याही पोलिसाचा जबाब नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. आरोपीच्या मित्राला सोबत घेऊन आरोपीचा शोध घेण्याचा पोलिसांच्या पत्रावर देखील त्यांनी आक्षेप घेतला. यासह कांदिवली येथील लालसिंग राजपुरोहित यांच्यावर देखील दमानिया यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…

Share

-