धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला?:करुणा मुंडे यांचा दावा; उद्या घोषणा करणार असल्याची माहिती

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. त्यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एक सूचक वक्तव्य केले आहे. त्यामध्ये 3 मार्च 2025 रोजी राजीनामा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे. अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी त्याची घोषणा होणार असल्याचा दावा त्यांनी केला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याला अटक झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह महायुतीच्या नेत्यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर राजकीय दबाव देखील वाढत आहे. त्यात आता करुणा मुंडे यांनी यासंदर्भात मोठा दावा केला आहे. धनंजय मुंडे यांनी आधीच अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला असून त्याची अधिकृत घोषणा तीन मार्च रोजी होणार असल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की, मला शंभर टक्के माहिती मिळाली आहे की, दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेतलेला आहे. उद्या शंभर टक्के राजीनामा होणार आहे. वाल्मीक कराड दोशी निघाला तर मी राजीनामा देणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी आधीच सांगितलं होते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची घोषणा करतील, अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे.

Share

-