धनंजय मुंडेंचा बीड प्रकरणात संबंध नाही:पण आरोपी जवळचा होता, नीतिमत्तेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे – रामदास आठवले
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सध्या चर्चा सुरू आहे. अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सोमवारपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनाम न घेतल्या पेटून उठू, असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला. तर करुणा मुंडे यांनी तर 3 मार्च रोजी धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल, असा दावाच केला. यावर केंद्रीय मंत्री यांनी प्रतिक्रिया दिली. मस्साजोगचे संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यायला पाहिजे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. अजितदादांनी याबाबत विचार करणे आवश्यक असल्याचेही आठवले म्हणाले. ते नाशिक येथे माध्यमांशी बोलत होते. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख् हत्या प्रकरणी सीआयडीने 1500 पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच या हत्येमागचा मास्टरमाइंड असल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. वाल्मीक कराडला मुख्य सुत्रधार म्हटल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनाम द्याव अशी मागणी जोर धरत आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. महायुतीच्याही काही नेत्यांकडूनही धनंजय मुंडेंचा राजीमाना घ्यावा, अशी मागणी होत आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत राजकीय दबाव वाढत आहे. नेमके काय म्हणाले रामदास आठवले? करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे काय संबंध आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. करुणा मुंडे यांना माहिती मिळाली असेल तर मला त्याबद्दल माहिती नाही. एक गोष्ट खरी आहे की, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखचा मर्डर केल्याची सगळी माहिती सीआयडीला मिळाली, असे रामदास आठवले म्हणाले. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनी निर्णय घेतला पाहिजे मला असे वाटते की, धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचा मोठ्या प्रमाणात जवळचा संबंध होता. पण, या कोणाशी काही संबंध नसेल असे काय पुरावेही नाही. परंतु धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी आहे. अजितदादांनी याबाबत विचार करणे आवश्यक आहे. खुनाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा कसलाही संबंध नाही. पण, खुनातील आरोपी जवळचा होता. नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादा पवार यांनी निर्णय घेतला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी या प्रकरणावर धनंजय मुंडे यांची भूमिका दुटप्पी असल्याचे देखील रामदास आठवले म्हणालेत. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणे गंभीर बाब रामदास आठवले यांनी रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला असेल ही बाब गंभीर असल्याचे ते म्हणाले या प्रवृत्ती ठेचून काढायला सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणे ही अत्यंत अयोग्य बाब आहे. तक्रार दिल्यानंतर आरोपी पकडले जातील. विरोधकांचे म्हणणे खरे असले तरी याच्यात राजकारण करण्याची गरज नाही. पोलिसांनी ऍक्टिव्ह राहणे महत्त्वाचे आहे. कायदे असले तरी सुद्धा समाजामध्ये कायदे मोडणारे असंख्य लोक आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.