जिल्ह्यातील गुंडगिरी संपवणार:कोणीही असला तरी पाठीशी घालणार नाही, संजय शिरसाटांचा इशारा; उद्धव-राज भेटीवरही केले भाष्य

छत्रपती संभाजी नगरचा पालकमंत्री देखील मीच होणार आहे. जिल्ह्यात अनेक गुंडगिरीच्या घटना घडल्या आहेत. गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याला देखील आळा घालणार आहे, मग तो कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी असला, तरीही त्याच्यावर कारवाई केली जाईल. जो कोणी धाक नाही असा समजत असेल, तर त्याला धडा देखील शिकवला जाईल, असा इशाराही संजय शिरसाट यांनी दिला. ते रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शिरसाट म्हणाले की मला समाज कल्याण खाते मिळाल्यामुळे आनंद आहे. एकनाथ शिंदे यांनी नवीन जबाबदारी दिली आहे. उद्या मस्साजोगला जाणार उद्यापासून दौरे सुरू होणार आहे. मी आणि उदय सामंत उद्या बीड जिल्ह्यात जाणार आहे. मस्साजोग आणि परभणी येथे जाणार आहे. या ठिकाणच्या परिस्थितीचा अहवाल देखील देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व समाजात सलोखा राखण्यासाठी प्रयत्न असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्धव-राज भेटीवर केले भाष्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का याच्या चर्चा सुरू असतात. लग्नात भेटले तर वातावरण तापण्याची गरज नाही. राज ठाकरे यांनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरे यांनी हात मागे घेतला, त्यामुळे दोघीही आता एकत्र येण्याची शक्यता नाही, असे मत समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांनी व्यक्त केले आहे. शहरातील पाणी प्रश्न सोडवणार छत्रपती संभाजी नगर मधील पाण्याच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना बोलून यासंदर्भात तोडगा काढला जाईल. दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय साधून, हा प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

Share

-