दिव्य मराठी विश्लेषण:मोदी-फडणवीसांपेक्षा गडकरींच्या जास्त सभा

लोकसभेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १८ सभा घेतल्या होत्या, या वेळी फक्त १० सभाच झाल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ६४, तर केंद्रीय मंत्री गडकरींच्या मात्र ७२ सभा. विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी ६ वाजता थंडावल्या. शेवटचा दिवस ‘कॅश’ करण्यासाठी सकाळपासूनच प्रमुख नेत्यांनी सभा, पदयात्रांचा धडाका लावला होता. महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी अखेरच्या क्षणापर्यंत सभा गाजवत अाघाडीच्या नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही अखेरच्या दिवशी सभा झाली. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, सुप्रिया सुळे यांनीही महायुतीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनीही वसईत अखेरची सभा घेतली. भाजपचे स्टार प्रचारक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या सभांना जास्त मागणी असल्याचे समोर आले. आजचा दिवस छुपा प्रचार
मंगळवारी दिवसभर सभा, मिरवणुकांना बंदी असेल. डोअर टू डोअर प्रचारावर उमेदवारांचा भर राहील. विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी ४१३६ उमेदवार रिंगणात आहेत. यात २०८६ अपक्ष, तर १५० हून अधिक बंडखोर आहेत. निवडणूक आयोगाने महिनाभरात आचारसंहिता भंगाच्या ८६६८ पैकी ८६७८ तक्रारींचा निपटारा केला, तर ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.
भाजपकडून मध्य प्रदेशचे सीएम माेहन यादव, गोव्याचे सीएम प्रमोद सावंत, तर काँग्रेसकडून तेलंगणाचे सीएम रेवंत रेड्डी, कर्नाटकचे सीएम सिद्धरामय्या
या मुद्द्यांनी गाजवल्या प्रचारसभा आघाडी : संविधान बचाव, जातनिहाय आरक्षण, ५० % आरक्षणाची मर्यादा ओलांडणे, शेतकरी कर्जमाफी, महालक्ष्मी योजनेतून महिलांना अर्थसाह्य, प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर या याेजनांची घोषणा. ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध करत ‘जुडोगे तो जितोगे’ हा नवा नारा. महायुती : लाडकी बहीण, मोफत सिलिंडर, शेतकरी कर्जमाफी, रोजगार, बेरोजगार भत्ता, परकीय गुंतवणूक, उद्योग उभारणी, वीज बिल माफी या योजनांचा महायुतीकडून प्रचार करण्यात आला. हिंदुत्ववादी मते एकगठ्ठा मिळवण्यासाठी ‘बटेंगे तो कटंेगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा.

Share

-