दिव्य मराठी विशेष:साेशल मीडियावर मारहाण अन् हत्येशी संबंधित व्हिडिओ मुलांना प्रत्यक्ष आयुष्यात घाबरवतात; घराबाहेर पडू इच्छित नाहीत, एकटे राहण्यास पसंती
मुलांशी संबंधित सुरक्षेची चिंता वाढत आहे. नुकतेच इंग्लंड आणि वेल्समध्ये मुलांवर केलेल्या एका अभ्यासात आढळले की, लाखो किशोरवयीन मुले सोशल मीडियावर पाहिल्या जाणाऱ्या हिंसाचारामुळे घराबाहेर पडण्यास भीत आहेत. १३ ते १७ वयाच्या १० हजारांहून जास्त मुलांवर यूटा अँडोमेंट फंडाद्वारे केलेल्या अभ्यासानुसार, सोशल मीडिया पाहणाऱ्या चारपैकी एका किशोरवयीनास वास्तव जीवनात हिंसाचार, ज्यात लढाई, मारहाण, चाकू भोसकणे, चकमक आदी स्वत: अल्गोरिदमिक रिकमेंडेशनच्या माध्यमातून दाखवते. सोशल मीडिया क्लिपमध्ये हिंसाचार पाहणाऱ्या १० पैकी ८ मुलांनी सांगितले की, यामुळे त्यांना आपल्या क्षेत्रात कमी सुरक्षा जाणवली. दुसरीकडे, ६८% मुलांनी मान्य केले की, यामुळे त्यांची बाहेर जाण्याची शक्यता कमी झाली. तरुणाईने सांगितले की, सोशल मीडियावर आपला वचक बसवण्यासाठी क्लिप शेअर केली जाते. वारंवार हिंसाचार पाहिल्यामुळे मुले असंवेदनशील होतात आणि हिंसा करणे त्यांना सामान्य वाटते. नुकतेच, ऑस्ट्रेलियन पीएम अँथीन अल्बानीज यांनी सोशल मीडियाच्या उपयोगाबाबत किमान वयोमर्यादा लागू करण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. अल्बानीज म्हणाले, बऱ्याचदा सोशल मीडिया अजिबात सामाजिक असत नाही आणि आपणा सर्वांना हे माहीत आहे. सत्य असे की, हे आपल्या मुलांना नुकसान पोहोचवत आहे आणि ते राेखू इच्छितो. बहुतांश देशांमध्ये सोशल मीडिया वापर करण्याचे किमान वय १६ वर्षे आहे. मात्र, अनेक सोशल साइट हे कायदे पूर्ण करण्यात अपयशी राहिले आहेत. सोशल मीडियावर अल्पवयीनांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे लागू होणार आहेत. याअंतर्गत टेक कंपन्या मुलांना हिंसा किंवा वयाच्या हिशेबाने अयोग्य सामग्री दाखवण्यापासून रोखण्यात अयशस्वी ठरत असेल तर त्यांच्यावर मोठा दंड लावला जाईल. सोशल मीडियातून प्रेरणा घेऊन हिंसक घटना घडवताहेत अनेक मुले सोशल मीडियावर मुलांच्या दुबळेपणाचे शोषण केले जात आहे. सप्टेंबरमध्ये चार्लेट ओब्रायन व एला कॅटली-क्रॉफर्डने आत्महत्या केली होती. दोघी १२ वर्षांच्या होत्या.गुंडांनी स्नॅपचॅटद्वारे त्यांच्यावर निशाणा साधला होता. फेसबुक, स्नॅपचॅट व इन्स्टाग्रामवरही ३३%-३१% तरुणाई हिंसक सामग्री पाहते. इंग्लंड व वेल्सचे ३,३०,००० तरुणाईच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियातून प्रेरणा घेऊन त्यांनी हिंसक घटना घडवल्या आहेत.