दिव्य मराठी अपडेट्स:जरांगे पाटील आज जाहीर करणार उपोषणाची तारीख; एकट्याने उपोषण करण्याची तयारी
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स जरांगे पाटील आज जाहीर करणार उपोषणाची तारीख वडीगोद्री – मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपाेषणाचा निर्णय घेतलाआहे. मंगळवारीआंतरवाली सराटी येथे ते उपोषणाची घोषणा करणार आहेत. यात सामूहिकउपाेषण करण्याचे त्यांनी अगोदरच जाहीर केले होते. मात्र, आता उपोषणाला कुणी आले नाहीतरी आपण मात्र एकट्याने उपोषण करणारच,असा इशारा त्यांनी दिला आहे. रविवारी नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तारव मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. नवेसरकार सत्तेवर येताच आपण पुन्हा आंदोलनकरणार असल्याचा इशारा जरांगे यांनीयापूर्वीच दिला होता. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलेनाही? या प्रश्नावर जरांगे यांनी, हा आमचाप्रश्न नसून मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचेआम्हाला देणे घेणे नसल्याचे सांगत त्यांनीभुजबळ यांच्यावर बोलणे टाळले. सरकारने याहिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्नमार्गी लावावा, असे आवाहन करत सरकार याअधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गीलावेल, अशी अपेक्षा जरांगेंनी व्यक्त केली. सिन्नर शहरात दुचाकीवरील तरुणाचा मांजाने गळा चिरल्याने पडले 15 टाके सिन्नर (जि.नाशिक) – सरदवाडी राेड भागात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा सोमवारी दुपारी नायलाॅन मांजाने गळा चिरल्याने त्याला 15 टाके पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच शहरात एकाचा दुचाकीवरून जाताना गळा कापल्याने त्याला 25 टाके पडले होते. महिनाभरात ही दुसरी घटना घडल्याने शहरात बंदी असलेल्या नायलाॅन मांजाचा सर्रास वापर हाेताना दिसत आहे. गाेपी फाेडसे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोपी हा दुचाकीने सरदवाडी रस्त्याने भाटवाडीकडे जात हाेता. झापवाडी शिवारातील बेकरीजवळ नायलाॅन मांजा त्याच्या मानेत अडकला. काही कळण्याच्या आतच मांजाने त्याच्या मानेला खाेलवर जखम झाली. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला 15 टाके पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मांजाने गळा कापलेला तरुण उपचार घेताना. अदानींविरोधातील याचिका फेटाळली; याचिकाकर्त्याला 50 हजार रुपयांचा दंड मुंबई – महाराष्ट्र शासन आणि अदानी समूहातील 6600 मेगावॅट वीजपुरवठा करार करताना माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचार केला असून हा करार म्हणजे परवडणाऱ्या दरात वीजपुरवठा करण्याच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. एवढेच नव्हे तर बिनबुडाचे आरोप करणारा याचिकाकर्ता श्रीराज नागेश्वर एपुरवार याला 50 हजार रुपयांची कॉस्ट लावली. मुख्य न्यायमूर्ती डी.के. उपाध्याय आणि न्या.अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. 2 कोटींसाठी व्यापाऱ्याचेअपहरण; 5 जण गजाआड परळी – शहरातील व्यापारी अमोल डुबे यांचेअपहरण करुन 2 कोटींची खंडणीमागितली होती. या प्रकरणातपोलिसांनी पाच जणांना अटक केलीअसून त्यांच्याकडून दोन कार, एकगावठी कट्ट्यासह एकूण 17 लाखरुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 9 डिसेंबर रोजी रात्री 9 ते 11:30दरम्यान व्यापारी अमोल डुबे यांच्यादुचाकीला कार आडवी लावली. त्यांचेबंदुकीच्या धाकावर अपहरण केलेहोते. त्यांना 2 कोटींची खंडणीमागितली होती. कन्हेरवाडी घाटातत्यांच्याकडून 3 लाख 88 हजारांचीरोकड, 10 तोळ्याचे सोन्याचे बिस्किटअसा 8 लाख 28 हजारांचा ऐवजघेऊन त्यांना सोडले होते. पोलिसांनीचैतन्य उमाप, सागर सूर्यवंशी, सचिनजोगदंड, जय कसबे, शंकर जोगदंडयांना अटक केली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रणच दिले नाही; बावनकुळेंनी मागितली आठवलेंची माफी पुणे – गडबडीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्याचे निमंत्रण वेळेत पोहोचू शकले नाही, आमच्याकडून चूक झाली आहे. त्यामुुळे ‘मी रामदास आठवले यांची जाहीर माफी मागतो,’ असा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली. पुण्यात सुरू असलेल्या ‘पुणे पुस्तक महोत्सवाला’ भेट देण्यासाठी बावनकुळे पुण्यात आले होते. त्या वेळी ते म्हणाले, मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे, कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना भविष्यात महायुतीमध्ये चांगले स्थान मिळेल. शिंदेसेना, राष्ट्रवादीतील नेत्यांची नाराजी एकनाथ शिंदे आणि अजित पवार नक्कीच दूर करतील. भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि इतरांची मंत्रिपदावरून कोणतीही नाराजी नाही. मंत्रिमंडळ विस्तारात कोणतीही घराणेशाही नाही. प्रत्येकाला कर्तृत्वाने पद मिळाल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला. सोलापूरच्या विमान उड्डाणासाठी “तारीख पे तारीख’ सोलापूर – इंधन पुरवठा आणि डीजीसीएकडून आवश्यक परवाने अद्याप मिळालेले नसल्याने 23 डिसेंबरपासून मुंबईसाठी विमान उड्डाण घेणार नाही, अशी माहिती फ्लाय 91 एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ‘दिव्य मराठी’ला दिली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विमानसेवा सुरू करण्यासंबंधी नवीन दिवस ठरणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे साेलापूरकरांना विमान उड्डाणासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. सोलापुरातून 23 डिसेंबरपासून मुंबई आणि गोव्यासाठी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा करताना धुक्याचा विचार झाला नाही. आता थंडी वाढल्यानंतर ही समस्या समोर आली आहे. तसेच इंधन पुरवठा आणि विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरी विमानसेवा महासंचालनालय (डीजीसीए)कडून फ्लाय 91 एअरलाइन्स कंपनी काही आवश्यक परवाने अद्याप मिळालेले नाहीत, असे कंपनीचे म्हणणे आहे. सध्या थंडी खूप असल्याने धुके मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्याचा अडथळा विमानसेवेत होण्याची शक्यता आहे. शिवाय विमानासाठी लागणाऱ्या इंधन पुरवठ्याचाही प्रश्न असल्याचे सांगण्यात आले. आता डीजीसीएकडून आवश्यक परवाने मिळत नसल्याचे समोर आले आहे. घाऊक महागाई 1.89%; 3 महिन्यांत नीचांकी नवी दिल्ली – किरकोळनंतर घाऊक महागाईच्या आघाडीवर दिलासादायक स्थिती असून दोन महिन्यांपासून वाढीचे पर्व थांबले आहे. नोव्हेंबर महिन्यात महागाईचा दर 1.89 टक्क्यांवर आला असून तीन महिन्यांतील हे सर्वात कमी प्रमाण आहे. तथापि, गेल्या वर्षी याच कालावधीत घाऊक महागाई 0.39 टक्के होती. ऑगस्ट महिन्यात हा दर 1.25 टक्के होता.त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरात त्यात वाढ झाली होती. निर्मिती व उत्पादन क्षेत्रातील वाढत्या महागाईला आळा घालण्यात यश आले आहे. घाऊक मूल्य निर्देशांकात औद्योगिक उत्पादनांचा वाटा 64.23% आहे. किरकोळ महागाई नोव्हेंबरात 0.7% घटून 5.5% वर आली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून व्याज दर कपातीचे पर्व सुरू होऊ शकते,असे मत रिसर्च फर्म बार्कलेने आपल्या अहवालात व्यक्त केले आहे. पुढील वर्षातील पहिल्या पतधोरणात रिझर्व्ह बँक व्याज दरात 0.25% कपात करु शकते. भारत-चीन सीमावादावर बीजिंगमध्ये उद्या बैठक बीजिंग – भारत आणि चीनमधील सीमाप्रश्नी तोडगा काढण्यासाठी उभय देशांतील विशेष प्रतिनिधींची 18 डिसेंबरपासून बीजिंग येथे बैठक होणार असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. 21 ऑक्टोबर रोजी पूर्व लडाखमधून सैन्य माघारी घेण्याविषयीचा करारानंतर ही बोलणी होत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या नेतृत्वाखालील भारताचे पथक मंगळवारी बीजिंगला पोहोचेल. चर्चेची ही 23 वी फेरी आहे. भारत-चीनच्या 3488 किमी सरहद्दीवरील वादावर तोडगा काढण्यासाठी सन 2003 मध्ये भारत-चीनच्या विशेष प्रतिनिधी समिती गठित करण्यात आली होती.