सुट्यांमुळे जोगेश्वरी, इंद्रगढी, मनुदेवीच्या गडावर पर्यटकांची गर्दी:घाटनांद्रा परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांच्या गर्दींनी गजबजली

दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा, महाविद्यालये यांना सध्या सुट्या आहेत. यामुळे याच सुट्यांचा आनंद घालवण्यासाठी सध्या घाटनांद्रा परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांच्या गर्दींनी गजबजून गेली आहेत. या परिसरात असलेले जोगेश्वरी देवी, इंद्रगढी देवी तसेच मनुदेवीच्या गडावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. या परिसरात असलेली अशी अनेक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे देवीच्या गडाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे बघायला मिळत आहे. सध्या दिवाळी सुट्यांचा हंगाम सुरू असून व शनिवार, रविवार या सलग आलेल्या सुट्यांमुळे सुटी घालविण्यासाठी अनेक कुटुंबे आपल्या कुटुंबांसमवेत घराबाहेर पडून विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन सुटीचा आनंद घेत आहेत. घाटनांद्रा परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे असून यात जोगेश्वरी देवीचे मंदिर हे पुरातन काळातले असल्याने आणि विशेष म्हणजे, हे ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने आजही याठिकाणी पुरातन काळातले अवशेष सापडतात. राज्यभरातील पर्यटक देवीचे मंदिर हे खोल दरीत असल्याने संपूर्ण डोंगर पार करून खाली जावे लागते. चोहोबाजूंनी घनदाट जंगल आणि दाट झाडी असून हे स्थळ प्रेक्षणीय आहे. तसेच याच परिसरात इंद्रगढी देवीचेही मंदिर आहे. हे तीर्थक्षेत्र उंच गडावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी उंच डोंगर चढून जावे लागते. एकाच ठिकाणी दोन प्रेक्षणीय स्थळे असल्याने दोन्ही ठिकाणे पाहण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, धुळे, नंदुरबार,नांदेड,परभण ी, जालना आदी ठिकाणांहून रोज पर्यटक येत असून गडावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

Share