गडचिरोली जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के:तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू; रिष्टर स्केलवर 5.3 तिव्रतेची नोंद
तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यात जाणवले आहे. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 5.3 अशी नोंदविण्यात आलेली आहे.
अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. तेलंगणामध्ये बुधवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंप इतका जोरदार होता की महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या काही भागातही त्याचे धक्के जाणवले. सकाळी या धक्क्यांमुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात सकाळी 5.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हैदराबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 7.27 वाजता भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून 40 किलोमीटर खोल होते. छत्तीसगडमधील बिजापूर, सुकमा आणि जगदलपूर या तीन जिल्ह्यांमध्येही सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 7.27 च्या सुमारास आलेल्या या धक्क्यांनी येथील लोक भयभीत झाले आहेत. काही सेकंदांच्या या धक्क्यांमुळे लोक घराबाहेर पडले. सध्या कोणत्याही जीवित वा वित्तहानीचे वृत्त नाही.