निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह:मतदान केंद्रावरील व्हिडिओ देण्याची नाना पटोले यांची मागणी
76 लाख मतदानाची वाढ झाली. मात्र ही वाढ कशी झाली? याबाबत निवडणूक आयोगाने कुठलीही पत्रकार परिषद घेत माहिती दिली नाही. याबाबत आम्हाला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. संध्याकाळी साडे पाच नंतर झालेल्या मतदानाचे फुटेज आम्हाला दाखवावे, असेह नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या पतीच्या भाषणाची एक ऑडिओ क्लिप देखील ऐकवली. त्या क्लिपमध्ये निर्मला सीतारमण यांनी ईव्हीएमवर काही प्रश्न उपस्थित केल्याचे समजते. तसेच निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे नाना पटोले म्हणाले. ही बातमी अपडेट करत आहोत…