युरोपने दाखवला ट्रम्पना दम; युक्रेनसाठी उघडला खजिना:युद्धग्रस्त युक्रेनला 40 हजार कोटींची मदत

व्हाइट हाऊसमधील ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यातील चर्चेनंतर युराेपने रविवारी एकजूट दाखवली. युक्रेनच्या सुरक्षेसाठी आयाेजित लंडन बैठकीत सर्व नेत्यांनी आता युराेप स्वबळावर स्वत:ची सुरक्षा करेल, असे जाहीर केले. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या पुढाकाराने एकत्र जमलेल्या युराेपीय नेत्यांनी संरक्षण बजेट वाढवण्यावर सहमती दर्शवली. एका घडामाेडीत ब्रिटनने युक्रेनला शस्त्रास्त्र खरेदीसाठी युराेपात जप्त रशियासह युराेपीय निधीतून ४० हजार काेटी रुपयांची मदत केली. भविष्यातही मदत केली जाईल, अशी हमी दिली. स्टार्मर म्हणाले, हा एेतिहासिक क्षण आहे. युराेपला स्व सुरक्षेसाठी नवीन काही करण्याची संधी मिळत आहे. रशिया-युक्रेन युद्ध राेखण्यासाठी शांतता प्रस्ताव आणला जाईल. त्यात ब्रिटन-फ्रान्स-युक्रेनचा समावेश आहे. हा प्रस्ताव अमेरिकन अध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनाही पाठवला जाईल. शांती प्रक्रियेत अमेरिकाही सहभागी व्हावी, असे युराेपला वाटते. लंडनच्या बैठकीत युराेपचे ४४ देशांचे २४ नेते प्रत्यक्ष सहभागी झाले. इतर युराेपीय नेते शिखर बैठकीत व्हर्च्युअली हजर हाेते. या बैठकीला उपस्थितांमध्ये ईयूच्या अध्यक्ष उर्सुला वेन डेर, झेलेन्स्की, इटलीच्या जाॅर्जिया मेलाेनी, फ्रान्सचे मॅक्राॅन यांचा समावेश हाेता. युक्रेनला हवी सुरक्षा हमी, रशिया हल्लेखोर देश रक्षणासाठी ३० कोटी अमेरिकींकडे याचना का? पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी सांगितले की, ५० कोटी युरोपीय ३० कोटी अमेरिकेकडे याचना करत आहेत की १४ कोटी रशियनकडून आमची सुरक्षा करा. आम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहोत म्हणून नव्हे, तर आम्हाला स्वत:वर विश्वास नाही. आपल्या क्षमता ओळखून पुढे जावे लागेल. युरोप रशियन राष्ट्रपती पुतीनसमोर शरण जाणार नाही. लंडनमध्ये बैठक हल्ले सुरूच : रशियाने रविवारी पूर्व युक्रेनच्या क्रामस्तोक भागात ७९ ड्रोन हल्ले केले. यात एक बालक ठार झाला तर १३ जण जखमी झाले.