खडकपाडा परिसरात फर्निचरच्या गोदामाला आग:चित्रपटासाठी लागणारे साहित्य खाक; परिसरात आग पसरू नये याचीही खबरदारी
![](https://natepute.com/wp-content/uploads/2025/01/f4ozjrrz1t8gddq5-ezgifcom-resize-1_1737788820-2zXysl.gif)
मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या मालाड मध्ये शनिवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मालाड – दिंडोशी दरम्यान असणाऱ्या खडकपाडा परिसरात फर्निचरच्या गोदामाला ही आग लागली आहे. या गोदामामध्ये चित्रपटासाठी लागणारे साहित्य असल्याचे सांगण्यात येत आहे. या गोदामामध्ये पूर्ण लाकडी सामान असल्यामुळे आग झपाट्याने पसरली आहे. ही आगा नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच कुठलीही जीवित हानी झाल्याचे वृत्त देखील नाही. सुरुवातीला एका गोदामाला लागलेली आहे आजूबाजूला पसरत गेली आणि आता या आगीने भीषण रूप धारण केले आहे. ही आग वेगाने पसरत असून त्यामुळे आकाशात काळ्या रंगाचे धुक्याचे प्रचंड लोट पाहायला मिळत आहेत. हे धुराचे लोट लांब अंतरावरून देखील स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक देखील धीम्या गतीने सुरु असून ती वळवण्यात आली आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आणि फर्निचरची दुकाने आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे ही ज्या ठिकाणी लागली त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आणि फर्निचरची दुकाने आहेत. त्यामुळे आग आणखी पसरण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे दिंडोशी पोलिस आणि अग्निशामक दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून सुरक्षेच्या कारणामुळे आजूबाजूचा परिसर खाली केला जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अद्याप या आगीत कुठलीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. आग पसरू नये याची देखील खबरदारी या संपूर्ण आगी मध्ये फर्निचरचे गोदाम पूर्णपणे जळून खाक झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीत्त हानी झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या आजूबाजूच्या परिसरात ही आग पसरू नये याची देखील खबरदारी अग्निशामक विभागाच्या माध्यमातून घेतली जात आहे.