गादीने द्वेष, सूडाच्या विरोधात बोलावे:नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचा सल्ला; म्हणाले – त्यांचे वक्तव्य अत्यंत दुर्वेवी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांची बाजू घेत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी त्यांच्या पाठिमागे गड भक्कमपणे उभा असल्याचे म्हटले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. एखाद्या गादीने द्वेष आणि सूडाच्या विरोधात बोलायला हवे. समाजात शांतात निर्माण होईल, असे प्रमाचे संदेश द्यायचे असतात. मात्र, त्यांच्याकडून अशा कृत्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतल्यानंतर आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात आव्हाड म्हणाले की, नामदेव शास्त्री यांच्याकडून अशा कृत्यावर भाष्य करणे योग्य नाही. ते अत्यंत आदरणीय आहेत. मात्र आदरणीय व्यक्तीने आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात. असे माझे मत आहे. त्यांनी संतोष देशमुख यांच्या बद्दल केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचेही आव्हाड यांनी म्हटले आहे. नामदेव शास्त्री यांचे बोलणे योग्य नाही या संदर्भात आव्हाड म्हणाले की, नामदेव शास्त्री महाराज यांनी कोणाची पाठ राखण करावी, हे सांगण्या इतका एवढा मी मोठा नाही. मात्र पाठ राखण करत असताना संतोष देशमुख यांच्या बद्दल त्यांनी जे वक्तव्य केले. ते बोलणे योग्य नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. भगवानगडाच्या गादीची एक परंपरा आहे. या गादीचे मुख्य मठाधिपती हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर समर्थक होते. आता मी नामदेव शास्त्री यांना काही प्रश्न विचारणार असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. यावेळी त्यांनी एक यादीही वाचून दाखवली. गेल्या काही वर्षात कोणाचे जीव गेले, कोणावर हल्ला झाला, कोणाला धमकी देण्यात आली, अशी यादीच आव्हाड यांनी वाचली. हे सर्व वंजारी समाजातील व्यक्ती होते. त्या सर्वांना न्याय मिळणार आहे का? असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडे निर्दोष नाहीत आपण कशाचे समर्थन करत आहोत? हे पाहायला हवे. संतोष देशमुख यांची हत्या धनंजय मुंडे यांनी केलेला नाही, हे मी शंभर टक्के सांगतो. मात्र ते निर्दोष आहेत का? तर नाहीत. या गँगला पोसण्याचे आणि मोठ्या प्रमाणात राजाश्रय देण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले असल्याचा आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. काय म्हणाले होते नामदेव शास्त्री धनंजय मुंडे यांची मानसिक स्थिती मी जाणून घेतली असल्याचा दावा नामदेव शास्त्री यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या हाताला सलाईन लावलेली असल्याचा दावा देखील नामदेव शास्त्री यांनी केला आहे. धनंजय मुंडे गुन्हेगार व्यक्ती नाहीत. त्यांची पार्श्वभूमी देखील तशी नाही. तो एक राजकीय घराण्यातील व्यक्ती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या घराण्यातील व्यक्ती आहे. ते खंडणी घेऊन जगणारे व्यक्ती नसल्याचे नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ते शंभर टक्के गुन्हेगार नाहीत, हे मी ठामपणे सांगू शकतो, असे देखील नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत याची पक्षातील नेत्यांना देखील जाणीव आहे, असा दावा देखील नामदेव शास्त्री यांनी केला आहे.

Share

-