ग्रीनलँडवर कब्जा अन् टेरिफची धमकी;ट्रम्पविरोधात एकवटताहेत युरोपीय देश:अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्पविरुद्ध जर्मनी अन् फ्रान्सच्या दौऱ्यावर डेन्मार्कच्या पंतप्रधान
अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर कब्जा करण्याबाबत केलेल्या विधानामुळे डेन्मार्क सतर्क झाला आहे. ट्रम्प यांनी आधी कॅनडा आणि अलीकडे कोलंबियाला टेरिफ(व्यापार कर) वाढवण्याची धमकी दिल्यानंतर डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनी देशाच्या संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी मंगळवारी आपला युरोप दौरा सुरू केला. मंगळवारी फ्रेडरिकसेन बर्लिनला पोहोचल्या. तेथे त्यांनी जर्मनीचे माजी चान्सलर आेलाफ शुल्झ यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रान यांची भेट घेतली. पंतप्रधान फ्रेडरिकसेन ब्रुसेल्समध्ये थांबून त्या नाटो सरचिटणीस जेन्स स्टोलटेनबर्ग यांच्याशी चर्चा करतील. माजी जर्मन चान्सलर शुल्झ यांनी सांगितले की, सीमा बळाचा वापर करून बदलल्या जाऊ नयेत. अमेरिकी सिनेटमध्ये सुनावणी : आज केनेडी तर उद्या तुलसी, काश पटेल हजर होणार अमेरिकी सिनेटमध्ये येत्या दोन दिवसांत ट्रम्पच्या ३ वादग्रस्त सदस्यांच्या पुष्टीसाठी सुनावणी होईल. रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर, तुलसी गबार्ड आणि काश पटेल यांना सीनेट समितीच्या चौकशीचा सामना करावा लागेल.तुलसी, काश पटेल भारतवंशी आहेत. ગपलटवार : ट्रम्प यांच्याविरुद्ध खटला चालवणारे डझनभर वकील बडतर्फ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने न्याय विभागातील १२ हून अधिक वकिलांना बडतर्फ केले. त्यांनी ट्रम्पविरोधात खटले दाखल केले होते. काळजीवाहू ॲटर्नी जनरल जेम्स मॅकहेन्री म्हणाले, या वकिलांवर ट्रम्प यांचा अजेंडा प्रामाणिकपणे लागू करण्याचा विश्वास ठेवू शकत नाहीत. हे पाऊल अशा वकिलांविरुद्ध सूड उगवण्याची इच्छा दर्शवते, ज्यांनी ट्रम्प यंाच्यावर राष्ट्रीय सुरक्षा आणि निवडणुकीसंबंधीत गुन्ह्यांचे आरोप लावले होते. काश पटेल: एफबीआय संचालकपदासाठी नामांकीत काश पटेल यांची सुनावणीही गुरुवारी होईल. पटेल यांच्या नामांकनास षडयंत्राच्या सिद्धातांना प्रोत्साहन देणे आणि ६ जानेवारीच्या दंगेखाेरांना वाचवल्यामुळे टीकेचा सामना करावा लागला आहे. ४ नवे आदेश: लष्करातून ट्रान्सजेंडर बाहेर, कोरोना लस न घेणाऱ्या सैनिकांची नियुक्ती ट्रम्प यांनी लष्कराशी संबंधित ४ नव्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. यात ट्रान्सजेंडर लोकांना लष्करातून कमी करणे आणि विविध कार्यक्रम समाप्त करण्याच्या आदेशाचा समावेश आहे. कोराेना लस घेण्यास नकार दिल्यामुळे बडतर्फ केलेल्या ८०० सैनिकांच्या फेरनियुक्तीचे निर्देश दिले आहेत. ट्रम्प यांनी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकसित करण्याचाही आदेश दिला. त्यास द आयर्न डोम फॉर अमेरिका संबोधले आहे. तुलसी गबार्ड तुलसी गबार्ड यांना राष्ट्रीय गुप्तचर संचालकाच्या रूपात नामांकीत केले आहे. त्यांची सुनावणी गुरुवारी होईल. गबार्ड यांच्या गुप्तचर अनुभवाची कमतरता आणि अमेरिकीविरोधी अजेंड्यामुळे त्यांच्या पुष्टीत अडचण येऊ शकते. रॉबर्ट एफ. केनेडी ज्यु आरोग्य आणि मानवी सेवेसाठी नामांकीत रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांची सुनावणी बुधवारी होईल. केनेडींना लसीविरुद्ध केलेल्या टिप्पणीचा सामना करावा लागला आहे. त्यांनी ट्रम्पचे समर्थन केले आणि लसीवर संशय व्यक्त केला आहे.