निसर्ग कॉलनीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काम करण्याची गरज, डॉ. हाटकर यांचे प्रतिपादन

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्याने निसर्ग कॉलनी येथे ‘मानवहित संस्थेच्या’वतीने अभिवादन सभा आयोजित केली होती. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपा.गुड्डू भाऊ निकाळजे (नगरसेवक), तर प्रमुख वक्ता म्हणून डॉ. कोंडबा हाटकर यांनी आपली भूमिका मांडली. बाबासाहेबांनी निर्मिलेल्या मोठ्या कष्टाने निर्माण केलेल्या संस्था, संघटना जगल्या पाहिजे. तेव्हा बाबासाहेबांच्या पश्चात आपण त्यांना अपेक्षित असणारे काम करू शकतो, असे प्रतिपादन डॉ. कोंडबा हाटकर यांनी केले. त्याचप्रमाणे विचार मंचावर उपस्थित बामने सर यांनी ही संक्षिप्त स्वरूपात आपली भूमिका मांडली. अध्यक्षीय समारोप निकाळजे यांनी केला. राहुल हिवाळे, वाल्मिक शेळके यांनी अभिवादनपर गीते गायली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मानंद जाधव, संदीप गव्हांदे, दीपक वाघ, ज्ञानेश्वर जाधव, झिने बंधू, चंद्रमुनी गवई, कैलास राऊत, प्रकाश खरात आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे फोटो…

Share