गुइलेन बॅरी सिंड्रोम बाधितांना मोठा दिलासा:पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात होणार मोफत उपचार, पालकमंत्री अजित पवारांची माहिती
![](https://natepute.com/wp-content/uploads/2025/01/new-project-2025-01-26t125212697_1737876120-LLwzKU.jpeg)
गुइलेन बॅरी सिंड्रोम या दुर्मीळ आजाराने पुण्यात थैमान घातले आहे. एकीकडे या आजारामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सहन लागत आहे. तर दुसरीकडे आजाराच्या उपचारासाठी मोठा खर्च येत आहे. यामुळे अनेक पुणेकर काळजीत आहेत. अशात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रजासत्ताक दिनी मोठी माहिती दिली आहे. जीबीएस बाधित रुग्णांवर पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पुण्यात आतापर्यंत 73 जणांना गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराची बाधा झाली असून 14 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. शनिवारी जीबीएस बाधित एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, प्रशासनाकडून जीबीएस आजारावरील उपचारासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तर नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून न जाता, स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. काय म्हणाले अजित पवार?
गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजारावर मोफत उपचार करण्यात यावेत, अशी मागणी पुण्यातील नागरिकांकडून करण्यात येत होती. ती मागणी मान्य केली असल्याची माहिती आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना, गुलेन बॅरी सिंड्रोमची आजार वाढत आहे. या आजाराने बाधित रुग्णावर पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. याविषयी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या असल्याचे सांगितले. नागरिकांनी घाबरून जावू नये, काळजी घेण्याचे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांचे परिस्थितीकडे लक्ष
शहरात गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णांची वाढ होते आहे. कमला नेहरू पार्कमध्ये रुग्णांना मोफत उपचार मिळत आहे, आर्थिक ताण मिळू नये यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. या आजाराचे नवीन संकट आपल्यावर आले आहे, पण घाबरून जाऊ नका. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री या सर्वांचे त्यावर लक्ष असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. हे ही वाचा… गुईलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी:पुण्यातील रुग्णाचा सोलापुरात मृत्यू; बाधितांची संख्या 73 वर, 14 रुग्णांची प्रकृती चिंताजनक पुण्यात थैमान घातलेल्या गुईलेन बॅरी सिंड्रोम आजाराने बाधित एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. त्याला काही दिवसांपूर्वी जीबीएसमुळे प्रकृतील बिघडल्याने त्याला खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच तरुणाला आयसीयूतून बाहेर काढले. मात्र, पुन्हा श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्याचा अचानक मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पूर्ण बातमी वाचा…