गुलाबरावांनी गुलाबसारखे राहावे जुलाबराव होऊ नये:अजितदादा नसते तर शिंदे गटाचे काय झाले असते, पाटलांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींचा टोला
अजितदादा आमच्यामध्ये आले नसते, तर 100 जागा आल्या असत्या, असे विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केले होते. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गुलाबरावांनी गुलाबराव सारखे राहावे त्यांनी जुलाबराव होऊ नये, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. आमदार गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, गुलाबराव पाटलांचा गोड गैरसमज आहे. अजितदादा नसते तर शिंदे गटाचे काय हाल झाले असते? हे उत्तर महाराष्ट्राला चांगल्याने माहिती आहे. गुलाबरावांनी गुलाबराव सारख राहावे त्यांनी जुलाबराव होऊ नये, अशी माझी त्यांना विनंती आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले. पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत बोलणारे जास्त नाहीत, आधी रामदास कदम बोलून गेले, आता गुलाबराव पाटील बोलून गेले. मला कळत नह इक अचानक उफाळून येत आहे. एकत्र विधानसभा लढलो, जिंकलो. आता एकत्रित आले पाहिजे. शेवटी अजित पवार यांनी घेतलेली मेहनत आणि तिन्ही पक्षांनी घेतलेली मेहनत आम्ही नाकारत नाही, असे मिटकरी म्हणाले. अमोल मिटकरी म्हणाले, तिघांनी मिळून राज्यात महायुतीची सत्ता आणल्यानंतर आता अशा प्रकारचे वक्तव्य करून मला वाटते महायुतीमध्ये रामदास कदम किंवा गुलाबराव पाटील हे जाणीवपूर्वक अजित पवार यांना टार्गेट करत आहेत. गुलाबराव पाटलांनी समजून घ्यावे त्यांनी गुलाबासारखे राहावे. आता तुमचा सुगंध जरा कमी झालेला दिसतोय. मंत्रीपदी वर्णी लागते की नाही याबद्दल शंका आहे. गुलाबराव गुलाबराव राहा जुलाबराव होऊ नका एवढेच माझे म्हणणे आहे, असे मिटकरी म्हणाले. गुलाबराव पाटील काय म्हणाले होते?
गुलाबराव पाटील म्हणाले, विधानसभेला आम्ही केवल 85 जागा लढलो. कदाचित अजितदादा आमच्यामध्ये आले नसते तर त्या जागा आम्हाला मिळाल्या असत्या. त्यामुळे आमच्या 90 ते 100 जागा आल्या असत्या. अजित पवारांना घेतल्यानंतर आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी कधी म्हंटले नाही की यांना का घेतले. असा आमचा नेता आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले होते.