जळगाव रेल्वे दुर्घटनेचे ह्रदयद्रावक PHOTOS:शरीराचे अवयव तुटलेले, रेल्वेखाली छिन्नविच्छिन्न मृतदेह, घटनास्थळावर टाहो

जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकालगत कर्नाटक एक्सप्रेसने पुष्पक एक्सप्रेसच्या अनेक प्रवाशांना उडवल्याची भयंकर घटना बुधवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पुष्पक रेल्वेने अचानक ब्रेक लावल्यामुळे तिच्या चाकांमधून ठिणग्या उडल्या होत्या. त्यानंतर रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी जिवाच्या आकांताने खाली उड्या मारल्या. पण त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना उडवले. त्यात 11 जण ठार, तर 40 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. खाली पाहा घटनेचे ह्रदयद्रावक फोटो लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा, प्रवाशांनी उड्या मारल्या:दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या ट्रेनने चिरडले; 11 ठार, 40 जण जखमी कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस ही ट्रेन यशवंतपूरहून हजरत निजामुद्दीनला जात होती. तर पुष्पक एक्सप्रेस (12533) लखनौहून मुंबईला जात होती. ब्रेक लावताना पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांमधून धूर निघत होता. त्यामुळेच ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवा पसरल्या आणि प्रवाशांनी घाबरून डब्यातून बाहेर उड्या मारल्या. वाचा पूर्ण बातमी…

Share

-