उद्धव ठाकरे खाष्ट सासू – राज:17 हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखलची करून दिली आठवण

उद्धव ठाकरे म्हणजे खाष्ट सासू आहे. त्यांच्या स्वभावामुळेच माझ्यासह नारायण राणे, एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले, अशी टीका राज ठाकरे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी केली. महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या आधी राज यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन केले होते. त्यात उद्धव यांच्या आदेशावरून मनसेच्या १७ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याची राज यांनी आठवण करून दिली. २०१९ मध्ये जनतेने भाजप-शिवसेनेला सत्तेत बसण्याचा आदेश दिला होता. उद्धव यांनी त्याचा अवमान केला, असेही राज म्हणाले. पायाला फ्रॅक्चर असलेले नांदगावकर व्हीलचेअरवर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अनेक सभांमधून, शिवतीर्थावरून सांगायचे की मशिदींवरील भोंगे खाली आलेच पाहिजेत. तेच काम राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा, असा सवाल राज यांनी केला. व्हीलचेअरवर सभेला शिवडीतील मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने ते व्हीलचेअरवर सभेला आले होते. त्यांना भाजपने पाठिंबा जाहीर केला आहे. सभेत भाजप पदाधिकाऱ्यांनी नांदगावकरांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

Share

-