मी केवळ हिंदू मतांवर निवडून आलो:मला एकही मुस्लिम मतदान नाही- नीतेश राणे

माझ्या मतदारसंघातील जनपतेच्या प्रेमातून मी तिसऱ्यांदा निवडून आलो आहे. माझ्या मतदारसंघातील हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणावर मतदान केले. मला एकही मुस्लिम मतदान नाही, असे भाजप आमदार नीतेश राणे यांनी म्हटले आहे. दरम्यान नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, आमच्यासारखे शिवरायाचे मावळे हे 24 तास 365 दिवस लोकांसाठी उपलब्ध असतात. टीका करणारे कावळे हे केवळ निवडणुकीपूरते असतात असा टोला त्यांनी लगावला आहे. पुढचे 3 वर्षे काम करणार नीतेश राणे म्हणाले की, हिंदुत्व आणि विकास या दोन मुद्यांवर मी निवडणूक लढवली आहे. मला पडलेल्या 58 हजार मतदारांपैकी एकही मतदान मुसलमान नाही. हे मी हक्काने सांगू शकतो. माझा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी विचाराचा मतदारसंघ आहे. पुढील 3 वर्षे सत्ताधारी आमदार म्हणून मी विकासाची प्रक्रिया सुरू ठेवणार आहे. भाजपचे हे नेते घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन,आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, सुधीर मुनगंटीवार, नीतेश राणे, गणेश नाईक, मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर, अतुल भातखळकर, शिवेंद्रराज भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल यांच्यासह देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असणारे अभिमन्यू पवार, राणाजगजितसिंह पाटील, यांच्यासह विधान परिषदेतील आमदार चित्रा वाघ, प्रवीण दरेकर हे देखील मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. राऊतांना मोदी कळालेच नाही नीतेश राणे काही दिवसांपूर्वी म्हणाले की, संजय राऊत यांना मोदी कळलेच नाहीत. त्यांना जिहादी अतिरेकी थरथर कापतात, याचा लवकरच अनुभव येईल, असा हल्लाबोल भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केला. हा काँग्रेसच्या काळातील भारत नाही, तर नरेंद्र मोदींच्या काळातील हिंदुस्थान आहे. मोदींमुळे जगातला हिंदू समाज आज सुरक्षित आहे.

Share