जपानमध्ये जन्मदर 125 वर्षांत विक्रमी नीचांकावर:वर्ष 2024 मध्ये 5% कमी मुले जन्मली; मृत्युदरात होतेय वाढ

जपानमध्ये जन्मदरात सतत नवव्या वर्षी घसरण नोंदली आहे. यामुळे देशाचे अस्तित्व व अर्थव्यवस्थेवर गंभीर धोका घोंगावत आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, २०२४ मध्ये जपानमध्ये फक्त ७ लाख २० हजार ९८८ बाळांचा जन्म झाला. हे २०२३ च्या तुलनेत ५% कमी आहेत. हा आकडा १२५ वर्षांत सर्वांत कमी आहे. दुसरीकडे, मृत्यूदर विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. २०२४ मध्ये जपानमध्ये १६ लाख लोकांचा मृत्यू झाला. म्हणजे, प्रत्येक जन्मलेल्या मुलामागे दोन लोकांचा मृत्यू होत आहे. जपानचा घटता जन्मदर आणि वेगाने वृद्ध होणारी लोकसंख्या आर्थिक स्थिती आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. जपानमध्ये आधीपासून ३०% लोकसंख्या ६५ वर्षांहून जास्त वयाची आहे. पंतप्रधान शिगेरू इशिबा म्हणाले, आपल्याला हे मान्य करावे लागेल की, जन्मदराची घसरण आतापर्यंत रोखली जाऊ शकत नाही. मात्र, विवाह दरात वाढ झाली आहे. ही भविष्यात सकारात्मक प्रभाव टाकू शकते. तज्ज्ञांनुसार, जन्मदरात घसरणीचे एक प्रमुख कारण कोविडमुळे लग्नांत आलेली घट आहे. मात्र, गेल्या वर्षी विवाह दरात २.२% घट नोंदली, जी एकूण ४ लाख ९९ हजार ९९९ लग्नांपर्यंत पोहोचली. मात्र, ही वृद्धीही आधी झालेल्या वेगवान घसरणीची भरपाई करू शकत नाही. माजी पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी जन्मदर वाढण्यासाठी अनेक पावले उचललेे होते. सरकारने राहण्यासाठी घर सबसिडी दिली होती. सरकारी डेटिंग ॲप लाँच केले होते. यामुळे लोक लग्न करण्यासाठी तसेच कुटुंब वाढवण्यासाठी प्रेरित होतील,असा त्यामागचा उद्देश होता. द. कोरियातही जन्मदर संकट, विद्यार्थी संख्या घटल्याने ४९ शाळा बंद
दक्षिण कोरियात जन्मदरात घसरणीचा परिणाम शिक्षण प्रणालीवर दिसत अाहे. शिक्षण मंत्रालयानुसार, २०२५ मध्ये ४९ शाळा कायमस्वरूपी बंद केल्या जातील. कारण, विद्यार्थ्यांच्या संख्येत घट येत आहे. यात ३८ प्राथमिक शाळा, ८ माध्यमिक शाळा आणि ३ उच्च माध्यमिक शाळा आहेत. ८८ टक्के बंद होणाऱ्या शाळा ग्रामीण भागांत आहेत. यामुळे राजधानी सेऊल आणि अन्य राज्यांतील शैक्षणिक स्तराची दरी आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत शाळा बंद होण्याची संख्या सतत वाढत आहे. वर्ष २०२३ मध्ये २२ शाळा बंद झाल्या तर २०२४ मध्ये ही संख्या ३३ झाल्या होत्या.

Share

-