काळ बदलला तशा कविताही बदलल्या- राज ठाकरे:’कोण तूं रे कोण तूं’ कविता सादर केली, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अभिजात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संवाद साधला. तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, जावेद आख्तर, असे अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी कविता सादर केली. ही कविता बाबासाहेब पुरंदरे लिखित हे काव्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून हे काव्य लिहिले आहे. उपस्थितांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, मी इथे भाषण करायला आलो नाही. माझे भाषण 30 तारखेला ठेवले आहे तेव्हा मी बोलेल. मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन. सरकारने जाहीर केले होते पण सरकारलाही माहीत नव्हते की हा दिन साजरा केला जातो. याची सुरुवात आपण केली. अनेक ठिकाणी आपण या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. आज आशाताई आल्या आहेत, त्यांना बरे वाटत नसताना देखील आज त्या इथे आल्या आहेत. एक गोष्ट मी आपल्याला निश्चित सांगेल की तुम्हाला सगळ्यांना प्रश्न चिन्ह पडला असणार की इथे उपस्थित सगळे मान्यवर आज तुमच्यासमोर कविता म्हणणार आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असणार की जावेद अखतर इथे काय करणार आहेत. त्यांना बोलवण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे भाषा, भाषा या विषयावर मी त्यांचे एक भाषण ऐकले होते. त्यावेळी मी विनंती केली की सोनाऱ्याने कान टोचल्यावरच तर ते लक्षात राहतात. ही मराठी भाषा, ही अभिजात भाषा, कशी टिकवली पाहिजे. परंतु दुसरी भाषा बोलणारा आपल्याला येऊन सांगणार आहेत. काळ बदलला तसे कविता बदलत गेल्या इथे अनेक लोक मराठी भाषेच्या प्रेमासाठी इथे आले आहेत. सोनाली बेंद्रे आल्या आहेत. आशुतोष गोवारीकर इथे आले आहेत. भाषा टिकवण्यासाठी एक पक्ष म्हणून आम्ही आंदोलन केले. सगळ्या गोष्टी सांगायचे हे व्यासपीठ नव्हे. कविता महत्त्वाच्या आहेत. काळानुसार अनेक गोष्टी बदलत आहेत. मध्यंतरी मी ऐकले की कविता पण बदलत चालली आहे. आपल्या लहानपणी एक कविता होती चिऊताई चिऊताई दार उघड, आता ही कविता बदलली आहे. चिऊताई चिऊ ताई दार उघड असा कावळा म्हणतो, आतून चिऊताई म्हणते आज नको हे घरी आहेत. कविता बदलली आता, काय करणार आपण. आत्ताच्या काळातली चिऊताई आहे ती. परंतु ज्या जुन्या कविता आपल्या कवींनी लिहून ठेवले आहे. मला इथे सगळे कवी लोक आणता आले असते. पण आज मी मुद्दाम जे कधी कविता म्हणत नाहीत अशा लोकांकडून मी कविता म्हणवून घेणार आहे. अशोक सराफ आले आहेत. त्यांनी अनेक डायलॉग म्हटले आहेत आज पहिल्यांदा कविता म्हणणार आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी कविता सादर केली. ही कविता बाबासाहेब पुरंदरे लिखित हे काव्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून हे काव्य लिहिले आहे. याचे शीर्षक आहे कोण तूं रे कोण तूं.. कोण तूं रे कोण तूं कोण तूं रे कोण तूं कालिकेचे खड्ग़ तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ? जानकीचे अश्रु तूं ? की उकळता लाव्हाच तूं ? खांडवांतिल आग तूं ? की तांडवांतिल त्वेष तूं ? वाल्मिकीचा श्लोक तूं ? की मंत्र गायत्रीच तूं ? भगिरथाचा पुत्र तूं ? की रघुकुलाचे छत्र तूं ? मोहिनीची युक्ति तूं ? की नंदिनीची शक्ति तूं ? अर्जुनाचा नेम तूं ? की गोकुळीचे प्रेम तूं ? कौटिलाची आण तूं ? की राघवाचा बाण तूं ? वैदिकाचा घोष तूं ? की नीतिचा उद् घोष तूं ? शारदेचा शब्द तूं ? की हिमगिरी नि:शब्द तूं ? की सतीचे वाण तूं ? वा मृत्युला आव्हान तूं ? शंकराचा नेत्र तूं ? की भैरवाचे अस्त्र तूं ? की ध्वजाचा रंग तूं ? वा बुद्धिचा श्रीरंग तूं ? कर्मयोगी ज्ञान तूं ? की ज्ञानियांचे ध्यान तूं ? चंडिकेचा क्रोध तूं ? की गौतमाचा बोध तूं ? तापसीचा वेष तूं ? की अग्निचा आवेश तूं ? मयसभेतिल शिल्प तूं ? नवसृष्टिचा संकल्प तूं ? द्रौपदीची हांक तूं ? प्रलंकराचा धाक तूं ? गीतेतला संदेश तूं अन् क्रांतिचा आदेश तूं ! संस्कृतीचा मान तूं अन् आमुचा अभिमान तूं ! कोण तूं रे कोण तूं…….कोण तूं रे कोण तूं