कॅनडाला ट्रम्पच्या धमक्यांमुळे ट्रूडोंच्या पक्षाला 26 टक्के समर्थन वाढले…:आठवड्यानंतर पीएम ट्रूडोंचा उत्तराधिकारी निवडेल लिबरल पार्टी

अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि तेथील पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याविरुद्ध आघाडी उघडली होती. ट्रम्प यांनी ट्रूडोंना गव्हर्नर ट्रूडो संबोधले आणि कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य करण्याचा प्रस्तावही दिला होता. मात्र, या हल्ल्याचा कॅनडातील ट्रूडाे यांची सत्ताधारी लिबरल पार्टीला मोठा फायदा मिळाला. नुकत्याच जारी झालेल्या निवडणूक सर्वेक्षणात लिबरल पार्टीला विरोधी कन्झर्व्हेटिव्ह पार्टीपेक्षा २६% जास्त पाठिंबा मिळाला आहे. इस्पोस सर्वेक्षणात लिबरल्सना ३८% आणि कंझर्व्हेटिव्हला ३६% समर्थन मिळाले आहे. ६ आठवड्यांपूर्वी कंझर्व्हेटिव्ह पार्टी ४६% वर होती, जी लिबरलपेक्षा २०% पुढे होती. मात्र, नवीन सर्वेक्षणात ट्रूडोंच्या पक्षाला २% आघाडी मिळाली आहे. ट्रम्प यांच्या हल्ल्यानंतरही ट्रूडोंनी कॅनडाचा आवाज उठवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. दुसरीकडे, दोन अन्य सर्व्हेतही लिबरल्स आणि कंझर्व्हेटिव्ह यांच्यात लोकांचा पाठिंबा जवळपास समान आहे. लेजर पोलमध्ये कंझर्व्हेटिव्हला ३८% आणि लिबरल्सला ३५% समर्थन मिळाले. एकोस पोलमध्ये लिबरल्सला ३८% आणि कंझर्व्हेटिव्हला ३७% पाठिंबा मिळाला आहे.ट्रम्प यांनी कॅनडातून आयात वस्तूंवर कर लावणे व कॅनडाला ५१ वे अमेरिकी राज्य करण्याची धमकी दिली आहे. यामुळे लिबरल्सला पाठिंबा मिळाला आहे. ट्रम्प म्हणाले होते, ट्रूडोंनी ५१ वे राज्य बनवावे ट्रम्प यांच्या विजयानंतर ट्रूडो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. यानंतर ट्रम्प म्हणाले की, गव्हर्नर ट्रूडोंची भेट झाली. त्यांना टेरिफ नको असेल तर कॅनडाने अमेरिकेचे ५१ वे राज्य व्हावे. मात्र, तोवर ट्रूडोंनी राजीनाम्याची घोषणा केलेली आहे.लिबरल्स ९ मार्च रोजी नेता निवडेल. पुढील निवडणूक २० ऑक्टोबरला व्हायला हवी. मात्र, त्याआधीही होऊ शकते. नव्या लिबरल नेत्याकडे त्वरित निवडणूक घेण्याचा पर्याय आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत लिबरल्स आणि कंझर्व्हेटिव्ह दोघेही बहुमतापासून दूर राहतील,असा दावा केला आहे. त्यांना लहान पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासेल. ट्रूडो यांच्या आवाहनाचा परिणाम; अमेरिकेचा दौरा रद्द करताहेत लोक कॅनडियन नागरिक अमेरिकेचा दौरा टाळत आहेत. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडियन लोकांना देशात सुट्या घालवण्याचे आवाहन केले आहे. यामुळे अमेरिकाचा प्रवास रद्द होत आहे. यूएस ट्रॅव्हल असोसिएशननुसार, कॅनडियन प्रवाशांच्या संख्येत १०% घसरणीमुळे अमेरिकेस २.१ अब्ज डॉलरचे नुकसान होईल. वेस्टजेट आणि एअर कॅनडाने अन्य ठिकाणांसाठीच्या बुकिंगमध्ये वाढ नोंदवली. अमेरिकी राज्य पर्यटन बोर्ड संभाव्य प्रभावांसाठी तयार करत आहेत. वेस्टजेटचे एलेक्सिस वॉन होन्सब्रोचने सांगितले की, ही प्रतिक्रिया अनोखी होती. कॅनडातील अनेक स्टोअरमधून अमेरिकी उत्पादने काढली जात आहेत. कॅनडाला वाचवू शकणार नाहीत कंझर्व्हेटिव्ह नेते- लिबरल पार्टी लिबरल पार्टीच्या संभाव्य नेतृत्वाच्या चर्चेदरम्यान, प्रमुख दावेदारांनी अमेरिकेविरुद्ध कठोर पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे.या नेत्यांनी सांगितले की, कंझर्व्हेटिव्ह नेते पियरे पोलीव्रे कॅनडाला वाचवू शकणार नाहीत. माजी केंद्रीय बँक गव्हर्नर मार्क कार्नी म्हणाले, ट्रम्प यांच्यासमोर उभा राहणारा सर्वात वाईट व्यक्ती पोलीव्रे आहे. ते ट्रम्पच्या भाषेचा वापर करत आहेत. माजी वित्तमंत्री क्रिस्टिया फ्रिलँड म्हणाले, अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या महायुद्धापासून कॅनडासमोरील गंभीर आव्हान सादर करत आहेत. पियरे पोलीव्रे यांच्याकडून या आरोपांना उत्तर देण्यात आले नाही.