कोल्हापुरात कर्नाटकच्या एसटीची तोडफोड:इचलकरंजी येथील हुलगेश्वरी रोडवरील घटना; धुळवड खेळताना गोळा फेक, प्रवासी जखमी

कोल्हापुरात कर्नाटकाच्या एसटी बसची तोडफोड करण्यात आली आहे. इचलकरंजीमध्ये धुळवड खेळताना हुलगेश्वरी रोडवर ही घटना घडली. या घटनेत काही प्रवासीही जखमी झाल्याची माहिती आहे. कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या बसवर हल्ला केला होता. त्यांनी बस चालकाच्या तोंडालाही काळे फासले होते. त्याला मारहाणही केली होती. या घटनेवर संताप व्यक्त केला जात असताना कोल्हापूरच्या इचलकरंजीत कर्नाटकच्या बसची तोडफोड करण्यात आली आहे. धुळवड खेळताना राखेचा गोळा फकून ही तोडफोड करण्यात आली. ही घटना घडली त्यावेळी बसमध्ये अनेक प्रवासी होते. त्यापैकी काहीजण या घटनेत जखमी झालेत. नेमके किती प्रवासी जखमी झाले हे समजू शकले नाही. पण या घटनेत एसटीची काचही फुटली आहे. या घटनेचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेत. त्यापैकी एका फोटोत बसची मागच्या बाजूची काच फुटल्याचे दिसून येत आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, बसची तोडफोड करणाऱ्या तरुणांनी यावेळी एसटी, रिक्षा, कार, ट्रक आदी सात ते आठ वाहनांची तोडफोड केल्याचीही माहिती आहे. पैसे देण्यास नकार दिल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पण त्याची पुष्टी झाली नाही. पोलिसांनी वाहनधारकांना मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. कर्नाटकात झाला होता एसटीवर हल्ला उल्लेखनीय बाब म्हणजे गत महिन्यात एसटी महामंडळाच्या बसवर कर्नाटकात हल्ला झाला होता. बस चालकाच्या तोंडाला काळेही फासण्यात आले होते. या घटनेचे अनेक फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पक्ष व संघटना आक्रमक झाल्या होत्या. पुण्यातील स्वारगेट व कोल्हापूरमध्ये आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात मारण्यात येणाऱ्या एसटीच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत कानडी बसची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. हे ही वाचा… काँग्रेसची एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर:अजित पवारांनाही चुचकारले; नाना पटोले यांच्या प्रस्तावाने राज्यात राजकीय धुळवड मुंबई – काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वाचा सविस्तर अजित पवारांच्या घरी येणार सूनबाई:धाकटे चिरंजीव जय पवार यांचे ठरले लग्न, शरद पवारांचा जोडीने घेतला आशीर्वाद; वाचा कोण आहे सून? मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पावर यांचे लग्न ठरले आहे. त्यांचा साखरपुडा येत्या 10 एप्रिल रोजी होणार आहे. जय पवार व त्यांच्या होणाऱ्या भावी पत्नीने स्वतः जोडीने जाऊन या कार्यक्रमाचे निमंत्रण शरद पवारांना दिले. या लग्नाच्या निमित्ताने पवार कुटुंबीयांत आलेला राजकीय दुरावा दूर होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

Share

-