कुंभ घटनेवर जागतिक मीडिया:CNN – बॅरिकेड तुटल्याने झाली चेंगराचेंगरी; NYT ने लिहिले- जमावाने शेकडो लोकांना पायदळी तुडवले

प्रयागराजच्या संगम किनाऱ्यावर मंगळवार-बुधवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. तर 50 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. मात्र, अधिकृतपणे कोणताही आकडा उघड करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सपासून ते ब्रिटनमधील बीबीसीपर्यंत सातत्याने या घटनेचे कव्हरेज करत आहेत. जागतिक प्रसारमाध्यमांमध्ये या घटनेची ठळकपणे चर्चा होत आहे. वाचा कोणी काय लिहिलंय… फ्रान्स 24 ने लिहिले – उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्यात बुधवारी एका प्रमुख धार्मिक उत्सवात चेंगराचेंगरी होऊन डझनहून अधिक लोक मरण पावले आणि अनेक जण जखमी झाले. पवित्र पाण्यात स्नान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतर भाविकांनी नदीच्या काठावर झोपलेल्या लोकांना चिरडल्याने चेंगराचेंगरी झाली. पाकिस्तानी वेबसाइट जिओ न्यूजने लिहिले – प्रयागराजमध्ये जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 15 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

Share

-