लातूर जिल्ह्यातील कारखान्याला भीषण आग:आगीत 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज; सुदैवाने जीवित हानी नाही

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे विक्टोरिया ॲग्रो फुड आणि प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड हा कारखाना आहे. या कारखान्यात आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. ही आग कारखान्यातील बग्यासला लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र नंतर या आगीत मोटार आणि वायरिंग जळून खाक झाले आहे. या आगीत सुमारे 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील विक्टोरिया हा फूड प्रोसेसिंगचा कारखाना आहे. या कारखान्यात असलेल्या बग्यासला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने सर्वांना याबाबतची माहिती कळवली. त्यानंतर शिरूर अनंतपाळ आणि देवणी येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. व्हिक्टोरिया फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात धान्यापासून अल्कोहोल तयार केले जाते. मात्र अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली? हा अपघात होता की घातपात होता? याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. याबाबत तपास करण्यासाठी शिरूर अनंतपाळ येथील पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत चाळीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

Share

-